CoronaVirus : आता यापुढे अंबाजोगाईचा प्रत्येक स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:02 IST2020-04-27T15:02:28+5:302020-04-27T15:02:51+5:30

बीडचे स्वॅब नेहमीप्रमाणे औरंगाबादलाच जाणार आहेत. 

CoronaVirus: Every swab of Ambajogai is now in Latur's laboratory for testing | CoronaVirus : आता यापुढे अंबाजोगाईचा प्रत्येक स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत

CoronaVirus : आता यापुढे अंबाजोगाईचा प्रत्येक स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत

ठळक मुद्देसोमवारी दोन स्वॅब तपासणीसाठी लातूरला गेलेही आहेत.

- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : कोरोना संशयित असलेल्या रुग्णांचे स्वॅब आगोदर औरंगाबादला पाठविले जात होते. परंतु आता यापुढे अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयातून घेतलेले सर्व स्वॅब लातूरला पाठविले जाणार आहेत. सोमवारी दोन स्वॅब गेलेही आहेत. तर बीडचे स्वॅब नेहमीप्रमाणे औरंगाबादलाच जाणार आहेत. 

जिल्ह्यात अंबाजोगाई स्वाराती रुग्णालय व बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयितांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार केलेले आहेत. सुरूवातीला बीड जिल्ह्यातील सर्व स्वॅब पुण्याला पाठविले जात होते. नंतर ते रद्द करून औरंगाबादला पाठविण्यात येऊ लागले. परंतु आता यात आणखी सुधारणा करण्यात आली आहे. अंबाजोगाईतून घेतलेले सर्व स्वॅब लातूरच्या प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. शनिवारी दोन स्वॅब पाठविण्यात आले आहेत. तर बीड जिल्हा रुग्णलायातील स्वॅब नेहमीप्रमाणे औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. आता याचा अहवाल लवकर प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. 

आता यापुढे सर्व स्वॅब लातूरच्या  प्रयोगशाळेत पाठविले जातील. सोमवारी दोन स्वॅब पाठविण्यातही आले आहेत. औरंगाबादला स्वॅब जाणार नाहीत. 
- डॉ.सुधीर देशमुख, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई

Web Title: CoronaVirus: Every swab of Ambajogai is now in Latur's laboratory for testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.