coronavirus : कोरोनाची धास्ती; कासारीत ग्रामस्थांनी रोखले मुलाचे अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 01:08 PM2020-03-24T13:08:02+5:302020-03-24T13:08:45+5:30

एक महिन्यांपासून मुंबईत सुरू होते उपचार

coronavirus: corona threat; Kasari villagers hold boy's funeral | coronavirus : कोरोनाची धास्ती; कासारीत ग्रामस्थांनी रोखले मुलाचे अंत्यसंस्कार

coronavirus : कोरोनाची धास्ती; कासारीत ग्रामस्थांनी रोखले मुलाचे अंत्यसंस्कार

googlenewsNext

धारूर :  तालुक्यातील कासारी येथे हृदयविकाराने मृत एका सहा वर्षीय मुलाचे अंत्यसंस्कार ग्रामस्थांनी कोरोना संशयित समजून रोखल्याची घटना आज सकाळी घडली. आरोग्य प्रशासनाने ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कासारी येथील बालक मनोहर भुजंगराव चोपडे (६) यावर हृदयविकारासंबंधी मुुंबई येथील जेजे रुग्णालयात एक महिन्यापासुन उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी( दि.२३ ) रोजी निधन झाले. निधनानंतर त्याच्यावर कासारी येथे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होतेे. मात्र कोरोनाच्या धास्तीने ग्रामस्थांत अस्वस्थता पसरली. ग्रामस्थांनी त्याच्या अंत्यसंस्कारास विरोध दर्शवला.

याबाबत ग्रामसेविका अनुचंदना थोरात यांनी प्रशासनास  माहिती दिली. यानंतर आरोग्य विभागाचे भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मारुती लगड यांनी कासारी येथे जावून ग्रामस्थांना समाजवत मार्गदर्शन केले. तसेेेेच तालूका आरोग्य अधिकारी डाॕ सचिन शेकडे याांनी येथे भेट दिली. यानंतर मयत मुलावर  अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: coronavirus: corona threat; Kasari villagers hold boy's funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.