CoronaVirus : बीडचा शुन्य कायम; एकमेव स्वॅबही निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 18:17 IST2020-05-03T18:17:00+5:302020-05-03T18:17:27+5:30
रविवारी एकमेव स्वॅब बीडमधून घेण्यात आला होता.

CoronaVirus : बीडचा शुन्य कायम; एकमेव स्वॅबही निगेटिव्ह
बीड : बीड जिल्ह्यात बीड व अंबाजोगाई येथे कोरोना संशयीत असलेल्या लोकांचे स्वॅब घेतले जातात. रविवारी एकमेव स्वॅब बीडमधून घेण्यात आला होता. त्याचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे.
आतापर्यंत बीडमधून १६१ तर अंबाजोगाईतून ५२ असे २१३ जणांचे स्वॅब घेतले असून सर्वच निगेटिव्ह आलेले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी ही माहिती दिली.