coronavirus : परभणी जिल्ह्यात आणखी ७ जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:43 IST2020-05-29T22:42:54+5:302020-05-29T22:43:39+5:30

सेलू, मानवत,पूर्णा आणि गंगाखेड तालुक्यातील कोरोनाबाधित

coronavirus: 7 more coronavirus infected in Parbhani district | coronavirus : परभणी जिल्ह्यात आणखी ७ जण कोरोनाबाधित

coronavirus : परभणी जिल्ह्यात आणखी ७ जण कोरोनाबाधित

परभणी: जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी त्यामध्ये आणखी ७ जणांची भर पडली. जिल्ह्यात आता एकूण ७४ व्यक्ती कोरोनाबाधित झाले आहेत.

जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल शुक्रवारी दिवसभरात दोन वेळा प्रशासनास मिळाला. दुपारी जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथील एक जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास दुसरा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला. त्यामध्ये आणखी ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

त्यामध्ये पूर्णा तालुक्यातील मालेगाव २, गंगाखेड तालुक्यातील माखणी, सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी, मानवत शहरातील विजयचाळ आणि जिंतूर येथील नुरानी मशिद येथील प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित आढळला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या एकूण ७४ झाली असून त्यातील एक जण कोरोनामुक्त झाला आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: coronavirus: 7 more coronavirus infected in Parbhani district