coronavirus : बीडमध्ये आणखी १३ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 17:28 IST2020-05-21T17:27:07+5:302020-05-21T17:28:01+5:30
जिल्ह्यातून मंगळवारी ११४ स्वॅब पाठवले होते. पैकी ९० निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आले होते. १३ स्वॅब प्रलंबित होते.

coronavirus : बीडमध्ये आणखी १३ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३७
बीड : बीडमध्ये आणखी १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ३७ झाली आहे.
जिल्ह्यातून मंगळवारी ११४ स्वॅब पाठवले होते. पैकी ९० निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आले होते. १३ स्वॅब प्रलंबित होते. या १३ स्वॅबचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील एक, धारुर तालुक्यातील कुंडी येथील १, तर माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथील ११ जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे. सुर्डी येथील रुग्ण हा कवडगाव थडी येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आला होता. इतर १२ रुग्ण नवीन आहेत. हे सर्वच रुग्ण मुंबईहून परतलेले आहेत.