corona virus: बीडमध्ये बससेवा सुरु आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:13 IST2020-03-17T14:12:18+5:302020-03-17T14:13:17+5:30
अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

corona virus: बीडमध्ये बससेवा सुरु आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका
बीड : कोरोना विषाणूमुळे बस सेवा बंद होणार, अशी अफवा बीडमध्ये पसरली आहे. बससेवा सुरूळीत सुरू असून प्रवासी, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू बाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अफवा पसरत आहेत. अशांतच मंगळवारी दुपारी बीडमधील सर्व बसेस बंद होणार, अशी अफवा समोर आली. याबाबत बीडचे आगारप्रमुख नितीन पवार यांनाही पाच ते सात प्रवाशांनी फोन करून विचारनाही केली. परंतु त्यांनी सेवा सुरू असल्याचे सांगितले. आपल्याला तशा कसल्याच सुचना नसून बससेवा सुरळीत सुरू असल्याचे सांगत त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. नागरिक, प्रवाशांसाठी ही सेवा सुरूच राहणार असल्याचेही पवार म्हणाले.