कोरोनाचा फटका, पाच कलांमध्ये केवळ ९ स्पर्धक - फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST2020-12-27T04:24:17+5:302020-12-27T04:24:17+5:30
बीड : कोरोना महामारीचा फटका कलेलाही सहन करावा लागला आहे. क्रीडा कार्यालयाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला अल्प प्रतिसाद ...

कोरोनाचा फटका, पाच कलांमध्ये केवळ ९ स्पर्धक - फोटो
बीड : कोरोना महामारीचा फटका कलेलाही सहन करावा लागला आहे. क्रीडा कार्यालयाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. पाच कला प्रकारांत केवळ ९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. हा सोहळा शनिवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीडच्यावतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सव प्रत्येकवर्षी आयोजित केला जातो. यात विविध कलाप्रकारांचा समावेश असतो. गतवर्षी जवळपास १५० पेक्षा जास्त कलाकारांनी यात सहभाग नोंदविला होत. परंतु यावर्षी कोरोनाचा याला मोठा फटका बसला आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे हा महोत्सव यावर्षी ऑनलाईन घेण्यात आला. यात मृदंग ३, हार्मोनियम १, भरतनाट्यम १, वक्तृत्व २, एकांकिका १ व अन्य १ अशा केवळ ९ कलाकारांनी यात सहभाग नोंदविला. तसेच या महोत्सवाचा आनंद न घेता आल्याने रसिक,प्रेक्षकांचाही हिरमोड झाला आहे.
दरम्यान, शनिवारी पार पडलेल्या या महोत्सवाला नाट्यलेखक डॉ.सतीष साळुंके, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सुप्रिया गाढवे, प्रा.दिनकर थोरात, प्रा.राजेंद्र बरकसे, प्रा.दीपक जमदाडे, डॉ.ओमप्रकाश झंवर, कविता कराड, अरून सरवदे, शाहीर विलास सोनवणे, गौरी देशमुख, योगेश करांडे, रमाकांत डिंगणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोट
गतवर्षी साधारण १५० पेक्षा जास्त कलाकारांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला होत. यावर्षी कोरोनामुळे हा महोत्सव ऑनलाईन घेण्यात आला. गतवर्षीपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसते.
अरविंद विद्यागर
जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड