शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

बीड : दीड वर्षांपासून घरातच असल्याने मुलांमध्ये स्थुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. टीव्हीमधला ‘मोटू’ या मुलांमध्ये अवतरत असल्याने ...

बीड : दीड वर्षांपासून घरातच असल्याने मुलांमध्ये स्थुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. टीव्हीमधला ‘मोटू’ या मुलांमध्ये अवतरत असल्याने पालकांना मुले लठ्ठ होण्याची चिंता सतावत आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे २०२० च्या मार्चपासून मुलांसाठी शाळा, मैदान, गार्डन बंद आहेत. आता तिसरी लाट मुलांसाठी धोक्याची असल्याची चर्चा असल्याने घराच्या बाहेर खेळायला जाण्यास पालक नकार दर्शवित आहेत. परिणामी, घरात एकाच जागी बसून टीव्ही पाहण्यात आणि मोबाइल खेळण्यात मुले दंग आहेत. या नादात काय खात आहेत? किती खात आहेत? याचा मेळ लागत नाही. मुलांच्या हट्टापायी त्यांना जंक फूड पुरविणाऱ्या पालकांचे प्रमाणही कमी नाही; मात्र दिवस-रात्र टीव्ही आणि मोबाइलचा सतत वापर मुले एकाच जागी बसून करीत असल्याने व संतुलित आहाराऐवजी फास्ट व जंक फूड खाण्याकडे कल वाढल्याने मुलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे. जंक फूड, तेलकट आणि गोड पदार्थ वेळी-अवेळी खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मुलांचे वजन वाढत आहे.

---------

मुलांमधील वाढते वजन टाळण्यासाठी पालकांनी जंक फूड, फास्ट फूड टाळून मुलांना पूर्ण आहार वेळेच्या वेळी द्यावा. मुले मोटू बनण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यावर प्रतिबंध आवश्यक आहे. या समस्येकडे जागरूक पालक लक्ष देत असले तरी त्यांचे प्रमाण केवळ दोन टक्केच आहे. -- डॉ. गुरूप्रसाद राऊत, बीड.

--------

कोरोनामुळे मुले घरात बसून आहेत. टी.व्ही. पाहणे, मोबाइल खेळणे यामुळे बैठक वाढली आहे. दैनंदिन आहार पद्धतीत बदल होत आहे. मुलांमधील वाढते वजन भविष्यात विविध आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकते. मुलांना फळे, पालेभाज्या खाण्यासाठी पालकांनी आग्रह धरावा. - डॉ. शिवाजी शेजुळ, बीड.

-----------

वजन वाढले कारण

लॉकडाऊनमुळे मुले घरातच आहेत. त्यांना शारीरिक, बौद्धिक, मानसिक कष्ट राहिलेले नाही. दोन वेळच्या आहारामध्ये अंतर ठेवले जात नसल्याने कॅलरी बर्न होत नाहीत. फळे, पालेभज्या खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. फास्ट फूड खाण्यावर भर दिला जात आहे. यात कॅलरी जास्त असतात. अनावश्यक कॅलरीजमुळे मुलांमधील वजन वाढले आहे. बसणे, झोपणे आणि खाणे वाढले.

ही घ्या काळजी

कुटुंब कोणतेही असो, खाण्याचे प्रमाण वाढले आहे. ते पचविण्यासाठी व्यायाम लागतो. त्यासाठी मुलांना घरातल्या घरात हालचाली करायला लावावी. बेकरीचे पदार्थ, जंक फूड, गोड, अतिगोड, तेलकट पदार्थ टाळावेत. मुलांच्या वेळी-अवेळी खाण्यावर प्रतिबंध घालावा. स्क्रीनटाइम कमी कसा करता येईल, यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत.

मुले टीव्ही, मोबाइल सोडतच नाहीत

कोरोनामुळे मुले घरीच आहेत. मोबाइलशिवाय अभ्यास होत नाही; परंतु अभ्यासाबरोबरच अवांतर पाहण्यात एकाच जागी बसून वेळ घालवतात. त्यामुळे बैठक वाढली आहे. मुले टीव्ही., मोबाइल सोडतच नाहीत. मुलांच्या आहारावर जागरुक पालक म्हणून आमचे लक्ष असते. त्यामुळे वजन वाढण्याची किंवा इतर आजाराची तक्रार अद्यापतरी नाही. -- सोनल जयकिशोर बियाणी, बीड.

-------------

मैदाने बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल आवश्यक आहे; मात्र इतरवेळी मोबाइलवर मुले खेळत बसतात, टी. व्ही. पाहतात, जंक फूड, फास्ट फूड टाळण्याचा अनेकदा प्रयत्न करतो. त्यासाठी घरातीलच पौष्टीक व स्वादिष्ट पाककृती करून मुलांची हौस भागविण्याचा प्रयत्न केला जातो. -- पांडुरंग बरकसे, बीड.