शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेत कॉपीचा सुळसुळाट! ड्रोनने पकडली कॉपी, केंद्र संचालकासह १७ शिक्षकांवर गुन्हा दाखल; प्रशासनाचा मोठा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 23:31 IST

पर्यवेक्षकांच्या डोळ्यादेखत सुरू होता कॉपीचा महापूर...

बीड : बीड तालुक्यातील चौसाळा येथील परीक्षा केंद्रावर बारावीच्या इंग्रजी पेपरवेळी मंगळवारी सर्रास कॉपी पुरवली जात हाेती. हा सर्व प्रकार ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला होता. याची प्रशासनाने गांभीर्याने घेतला असून, याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री १० वाजता १७ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशानंतर शिक्षण विभागाने ही धडक कारवाई केली असून यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.१० फेब्रुवारी रोजी चौसाळा येथील केंद्र क्रमांक २२४ वर इंग्रजीच्या पेपरवेळी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले होते. यामध्ये १६ परीक्षा दालनांमधील पर्यवेक्षक कॉपीला प्रतिबंध न करता उलट परीक्षार्थ्यांना सर्रास कॉपी पुरविण्यास मदत करत असल्याचे दिसून आले. आरोपींनी संगनमत करून शासनाच्या 'कॉपीमुक्त' मोहिमेला हरताळ फासल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ गैरप्रकार कायदा १९८२ आणि बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोकडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.यांच्यावर झाले गुन्हा दाखल -प्रभारी गटशिक्षणाधिकारी समंदर हमीद खान पठाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये केंद्र संचालक संजय घाडगे, भागवत कुरुंद (चौसाळा महाविद्यालय), गोरोबा बचुटे, राजेश्री माने, वसीम शेख, आर. जी. करडकर, एस. आर. दांगट (नेकनूर महाविद्यालय), विनायक वजे, ताराचंद राठोड, ए. बी. अघाव, पी. के. रसाळ, जी. बी. चक्रे (मांजरसुंबा विद्यालय), सी. एस. मुळीक, बी. बी. सुपेकर, यु. डी. उगले, एम. एस. गवई आणि बालासाहेब पवार (लिंबागणेश विद्यालय) यांचा समावेश आहे.बीडमध्ये कॉपीचा सुळसुळाट!बीड जिल्ह्यात १०३ केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरू असून ४५,२४७ विद्यार्थी भवितव्य अजमावत आहेत. प्रशासनाचे 'कॉपीमुक्त' दावे पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला फोल ठरले. अनेक केंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला, तर चौसाळ्यात ड्रोनने हा प्रकार उघड केला. यामुळे पारदर्शक परीक्षेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mass Copying Busted in 12th Grade Exam; 17 Teachers Booked

Web Summary : Beed's 12th-grade English exam saw rampant cheating. Drone footage exposed 17 teachers aiding students. Police filed charges, exposing flaws in anti-copying efforts.
टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाTeacherशिक्षकStudentविद्यार्थीBeedबीड