‘भाजपाकडून संविधान, लोकशाहीस धोका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:13 IST2018-09-29T00:12:44+5:302018-09-29T00:13:13+5:30

भाजप सरकारकडून संविधान, लोकशाहीला धोका निर्माण झालेला असल्याने देशभरातील समविचारी पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत. सरकार मनुवाद अनु इच्छित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजीया खान यांनी व्यक्त केले. संविधान बचाव या कार्यक्रमानिमित्ताने त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

'Constitution of the BJP, the threat of democracy' | ‘भाजपाकडून संविधान, लोकशाहीस धोका’

‘भाजपाकडून संविधान, लोकशाहीस धोका’

ठळक मुद्देमहिला असुरक्षित : फौजिया खान, विद्या चव्हाण यांची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : भाजप सरकारकडून संविधान, लोकशाहीला धोका निर्माण झालेला असल्याने देशभरातील समविचारी पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत. सरकार मनुवाद अनु इच्छित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजीया खान यांनी व्यक्त केले. संविधान बचाव या कार्यक्रमानिमित्ताने त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर संविधान बचाव कार्यक्र म हाती घेण्यात आला आहे. दि.२८ सप्टेंबर रोजी बीडमध्ये हा संविधान बचाव कार्यक्र म घेण्यात आला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी आ.विद्या चव्हाण, उषाताई दराडे, रेखाताई रविंद्र क्षीरसागर, केशरबाई गंगाधर घुमरे, चंपावतीताई पानसंबळ यांच्यासह अ‍ॅड.डी.बी.बागल, राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर, गंगाधर घुमरे, फारु क पटेल, बरखत पठाण, रमेश चव्हाण, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना फौजीया खान म्हणाल्या की, ९ आॅक्टोंबरला औरंगाबाद येथे सविधान बचाव मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार व इतर नेते मंडळी उपस्थित राहणार आहे, असे त्या म्हणाल्या.

Web Title: 'Constitution of the BJP, the threat of democracy'