जलयुक्त, शेततळ्याची कामे मुदतीत पूर्ण करा-सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:23 AM2018-02-24T00:23:06+5:302018-02-24T00:23:12+5:30

जलयुक्त शिवार अभियानातील कामे तसेच मागेल त्याला शेततळे योजनेचे यंत्रणांना दिलेले कामाचे उद्दिष्ट दिलेली कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी संबधित अधिका-यांना दिल्या.

Complete water works, farm work in the deadline - Lion | जलयुक्त, शेततळ्याची कामे मुदतीत पूर्ण करा-सिंह

जलयुक्त, शेततळ्याची कामे मुदतीत पूर्ण करा-सिंह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जलयुक्त शिवार अभियानातील कामे तसेच मागेल त्याला शेततळे योजनेचे यंत्रणांना दिलेले कामाचे उद्दिष्ट दिलेली कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी संबधित अधिका-यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान व मागेल त्याला शेततळे योजनेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

२०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तीन टप्यात ७२२ गावांची निवड करण्यात आली असून टप्पा क्र. १ अंतर्गत निवड केलेल्या २७१ गावांमधील कामे पूर्ण झालेली आहेत. टप्पा क्र. २ मध्ये २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील २५६ गावांची निवड करण्यात आली असून गावातील कामांचा कालावधी २०१८ मार्च अखेर समाप्त होणार आहे. यामध्ये विविध यंत्रणाची एकूण ५०७३ कामे प्रस्तावित करण्यात आली असून जानेवारी २०१८ अखेर ३४४३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

याकामामध्ये बांधबंदिस्ती, खोल समतल चर, माती नाला बांध, पाझर तलाव, गांव तलाव, सिंचन तलाव दुरुस्ती, सिंमेट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पुनरुज्जीवन, शेततळी, जलस्त्रोतातील गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश असून उर्वरित कामे मार्च- २०१८ अखेर पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांचे नियोजन व कालबध्द कार्यक्रमाबाबत तालुकानिहाय व क्षेत्रीय कर्मचारी निहाय जिल्हाधिकरी एम.डी. सिंह यांनी सविस्तर आढावा घेवून प्रलंबित कामे मार्च २०१८ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अंमलबजावणी यंत्रणांना केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी एम. डी सिंह यांनी टप्पा क्र. ३ मध्ये २०१७-१८ साठी जिल्ह्यातील एकूण १९५ गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांची एकूण ३३८५ कामे आराखडयात प्रस्तावित करण्यात आली आहेत. एकूण आराखडा १३९.८१ कोटी रुपयाचा आहे. टप्पा क्र. तीन मध्ये बांधबंदिस्ती, खोल समतल चर इत्यादी क्षेत्र उपचाराची कामे ८९२६५ या क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. तसेच माती नाला बांध, अर्दन स्ट्रक्चर, सिंमेट नाला बांध, पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापुरी बंधारा, सिंचन तलाव दुरुस्ती, सिंमेट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पुनरुज्जीवन शेततळी, वनविभागामार्फत वनतळी, गुरे प्रतिबंधक चर जलस्त्रोतातील गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावे कामांची सविस्तर अंदाजपत्रके तयार करुन त्यास प्रशासकीय मान्यता घेऊन निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी अशा सूचना त्यांनी केल्या.

तसेच मागेल त्याला शेततळे कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात ६ हजार ५०० शेततळे उभारण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. एकूण १२ हजार ३१२ शेतकºयांनी आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले असून ७ हजार ९०३ शेतकºयांना कामे करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिले आहेत. १५ फेब्रुवारी अखेर एकूण ३ हजार ७५४ शेततळयाची कामे पूर्ण झाली असून ५२६ कामे प्रगती पथावर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ यांनी दिली. या बैठकीस जिल्हा व तालुकास्तरीय समितीचे सदस्य, यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Complete water works, farm work in the deadline - Lion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.