शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
3
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
4
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
5
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
6
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
7
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
8
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
9
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
10
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
11
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
12
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
13
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
14
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
15
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
16
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
17
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
18
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
19
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
20
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणांचा तुटवडा करून कंपनीने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST

नांदुरघाट : नुकताच मान्सूनचा मृग नक्षत्राचा पहिला पाऊस जोरदार झाला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. परंतु काळ्‍या आईची ओटी ...

नांदुरघाट : नुकताच मान्सूनचा मृग नक्षत्राचा पहिला पाऊस जोरदार झाला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. परंतु काळ्‍या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी व्याजाने कर्जाने पैशाची जमवाजमव करत आहे. एवढे करूनही त्याला पाहिजे ते बियाणे मिळू शकले नाही.

बीड जिल्ह्यातील घाटाच्या वरील भागांमध्ये कापूस क्षेत्र ७० टक्के असते. कापूस पीक खर्चिक झाले. वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. वाढत्या तेलाच्या किमती पाहून सोयाबीनकडे शेतकरी वळला. परंतु पेरणीच्या आधीच सोयाबीनचा तुटवडा झाला आहे. महामंडळाचे महाबीज सोयाबीन गायब असून यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा सवाल शेतकरी करीत आहेत. दहा टक्के शेतकऱ्यांनादेखील बियाणे मिळाले नाही. हीच संधी पाहून कंपनीने दिवसाला आपल्या बॅगवरील किमती मोठमोठ्या वाढवून बाजारात एमआरपीवर विक्री सुरू केली. शेतकरी अडचणीत होता. त्याला पेरणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कंपनीने लावलेल्या किमतीत शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. त्यामुळे बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले.

जवळपास ३७०० रुपयांना ३० किलो सोयाबीनची बॅग शेतकरी विकत घेऊ लागला. शेतकऱ्यांचे तेच बियाणे कंपनीने ४० ते ४५ रुपये किलोने घेऊन १२३ रुपये किलोने कंपनी तेच बियाणे शेतकऱ्यांना विकू लागली. तरीसुद्धा सध्या पेरणीच्या आधीच बियाणांचा तुटवडा निर्माण झाला. एकंदर कंपनीने भरमसाट लूट केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

सोयाबीन बियाणांचा कृत्रिम तुटवडा करून जी लूट चालू आहे, ती म्हणजे मढ्यावरील लोणी खाण्यासारखीच आहे. याला कृषी विभागाचे संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार आहे. त्यांच्या संगनमताने वितरकही तुटवडा निर्माण करून अवाच्या सवा दराने बियाणे विकत आहेत. आधीच कोरोनाने मारले व आता या निष्क्रिय व्यवस्थेने मारले.

- नारायण हंगे, पदाधिकारी, मनसे.