बीड, जालना, औरंगाबाद पोलिसांचे एकत्रित ‘कोम्बींग आॅपरेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 04:54 PM2018-10-20T16:54:32+5:302018-10-20T16:57:27+5:30

मराठवाड्यातील बीड, जालना आणि औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अचाकन ‘कोम्बींग आॅपरेशन’ सुरू केले आहे.

Combined 'Combing Operation' of Beed, Jalna, Aurangabad Police | बीड, जालना, औरंगाबाद पोलिसांचे एकत्रित ‘कोम्बींग आॅपरेशन’

बीड, जालना, औरंगाबाद पोलिसांचे एकत्रित ‘कोम्बींग आॅपरेशन’

googlenewsNext
ठळक मुद्दे गुन्हेगारी वस्त्यांची झडती सुरू  पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा

बीड : मराठवाड्यातील बीड, जालना आणि औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अचाकन ‘कोम्बींग आॅपरेशन’ सुरू केले आहे. यामध्ये गुन्हेगारी वस्त्यांची झाडाझडती घेणे सुरू केले आहे. या आॅपरेशनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा नियोजित करण्यात आलेला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पोलीस उपअधीक्षक, ३ स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक, १० पोलीस अधिकारी, १०० पोलीस कर्मचारी, ५० महिला कर्मचारी या आॅपरेशमध्ये तैनात आहेत. आज सायंकाळी साडेचार वाजल्यापासूनच हे आॅपरेशन सुरू करण्यात आलेले आहे.

बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक डॉ.अर्जून भोसले, गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, गेवराईचे पोनि दिनेश आहेर, सपोनि दिलीप तेजनकर हे या आॅपरेशनमध्ये सहभागी आहेत. गेवराई, अंबड, पैठन उपविभागातील गुन्हेगारी वस्त्यांची एकाचवेळी झडती घेतली जात आहे.

Web Title: Combined 'Combing Operation' of Beed, Jalna, Aurangabad Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.