शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्ड बल्डेड मर्डर ! प्रियकर आणि मुलाच्या मदतीने विहिरीत बुडवून संपविला पती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 15:38 IST

Cold Blooded Murder In Beed : मांगवडगावच्या आत्महत्येच्या प्रकरणास धक्कादायक कलाटणी

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये कोल्ड ब्लडेड मर्डरची घटना प्रेमात अडथळा, मुलाच्या नोकरीसाठी खून केल्याचे आले समोर

केज ( बीड ) : प्रेमप्रकरणात अडसर ठरत असल्याने तसेच अनुकंपा तत्त्वावर मुलाला नोकरीला लावण्यासाठी पतीचा सिनेस्टाइल काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार मांगवडगाव (ता. केज) येथे ११ रोजी समोर आला. मांगवडगाव शिवारात तीन महिन्यांपूर्वी विहिरीत एसटी बसचालकाचा मृतदेह आढळून आला होता. न्यायालयीन आदेशावरून पत्नी, प्रियकर व मुलावर खुनाचा गुन्हा नोंद झाला.

भीमराव रंगनाथ खराटे (५२, रा. भोगजी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे मयताचे नाव आहे. ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. २९ मे २०२१ रोजी मांगवडगाव (ता. केज) शिवारातील धनराज थोरात यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाइकांकडे दिला. या प्रकरणात तेव्हा युसूफवडगाव ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती.

दरम्यान, मयत भीमरावचे बंधू बालाजी रंगनाथ खराटे यांना पत्नी, तिच्या प्रियकरावर व मुलावर संशय होता. त्यांनी त्यांच्याविरुध्द तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तेव्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. केज येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार ११ रोजी रात्री बालाजी रंगनाथ खराटे यांच्या तक्रारीवरून मयत भीमरावची पत्नी राधाबाई भीमराव खराटे (४८), प्रियकर महादेव ऊर्फ बबन अच्युत खराटे (४०) व मुलगा सिध्देश्वर भीमराव खराटे (२८, सर्व रा. भोगजी ता.कळंब) यांच्याविरुध्द युसूफवडगाव ठाण्यात खुनाचा गुन्हा नाेंदविण्यात आला. आरोपी फरार असून तपास सहायक निरीक्षक विजय आटोळे करत आहेत.

हेही वाचा - बीडमधील प्रकल्प प्रेरणा घोटाळा; डॉ. मोगलेसह मते, कदम ‘मास्टर माईंड’

प्रेमात अडथळा, मुलाच्या नोकरीसाठी...राधाबाई खराटे व महादेव ऊर्फ बबन खराटे यांच्यात प्रेमसंंबंध होते. मात्र, यात पती भीमराव याचा अडथळा ठरत होता. शिवाय त्याला संपविल्यानंतर एसटी महामंडळातील सेवा कालावधीचे पैसे मिळतील तसेच मुलगा सिध्देश्वर यास अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लावता येईल, यामुळे खून केल्याचे तक्रारीत नमूद आहे. राधाबाई व महादेवने रचलेल्या भीमरावच्या खुनाच्या कटात सिध्देश्वरलाही सामावून घेतले.

हत्या करुन आत्महत्येचा बनावराधाबाई खराटे व महादेव यांनी भीमरावचा कट रचून खून केला. त्यास विहिरीत बुडवून मारल्यानंतर आत्महत्या भासविली. मात्र, कोल्ड ब्लडेड मर्डरचा हा थरार अखेर उघडकीस आला. या घटनेने कळंबसह केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद