पाटोद्यात नगराध्यक्षपतीची सीओंना धमकी; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:42 IST2019-02-12T23:42:22+5:302019-02-12T23:42:46+5:30
येथील नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यास अर्वाच्च भाषा वापरून धमक्या दिल्याप्रकरणी नगराध्यक्षांच्या पती विरु ध्द पोलिसात गुन्हा दाखल झला आहे.

पाटोद्यात नगराध्यक्षपतीची सीओंना धमकी; गुन्हा दाखल
पाटोदा : येथील नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यास अर्वाच्च भाषा वापरून धमक्या दिल्याप्रकरणी नगराध्यक्षांच्या पती विरु ध्द पोलिसात गुन्हा दाखल झला आहे. गुन्हा दाखल करू नये म्हणून मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव आणला गेला मात्र मुख्याधिकाºयांनी ठोस भूमिका घेत राजकीय दबाव झुगारून पोलिसांना गुन्हा दाखल करायला भाग पाडले .
मुख्याधिकारी नीलम बाबूराव कांबळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्र ारीत म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी कार्यालयीन सर्वसाधारण सभेचे काम सुरु होते. यावेळी अधिकारी, कर्मचाºयांसह नऊ नगरसेवक आणि नगराध्यक्षांचे पती संदीप उर्फ गणेश नारायणकर हे ही उपस्थित होते. यावेळी चौदाव्या वित्त अयोगातील कामांची चर्चा झाली. कर्मचाºयाने मागील खर्चासाठी मान्यतेचा मुद्दा वाचून दाखवल्यानंतर नारायणकर यांनी हातपंप दुरु स्ती बिल देण्यास विरोध केला तसेच मुख्याधिकाºयांबरोबर अरेरावी केली. तू एकटीच आमच्या परवानगीशिवाय बिलं कशी काढतेस? काल तू कुठं होतीस? बीडची बैठक रद्द झाली तरी तू कलेक्टर आॅफिसला काय करत होतीस, का शिरूरला होतीस? अशा स्वरूपाची अर्वाच्च भाषा वापरली. त्यामुळे सभेचे कामकाज बंद पाडले, आणि सभा होऊ देणार नाही अशी धमकी दिली.
मंगळवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडल्यानंतर मुख्याधिकारी कांबळे यांनी पोलिस ठाणे गाठले. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिस आणि मुख्याधिकारी कांबळे यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आला. मात्र कांबळे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. अखेर चार वाजे सुमारास पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला. प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार करपे तपास करत आहेत. यावेळी आष्टीचे उपअधीक्षक उपस्थित होते. श्