बीड : जिल्हा न्यायालयाने खून प्रकरणातील आरोपी विशाल सूर्यवंशी यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपीच्या चौकशी दरम्यान त्याने लहानपणी झालेल्या भांडणावरून हर्षद शिंदे याचा खून केला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना सांगितली. यामुळे पोलिसही चक्रावून गेले. अशा किरकोळ घटनांवरून खून होत असेल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणखीनच बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बीड शहरातील शहरातील अंकुशनगर भागात नगरपालिकेच्या पाइपलाइनचे काम करणारा कंत्राटी मजूर हर्षद शिंदे याचा गोळ्या झाडून कोयत्याने तोंडावर वार करीत निर्घृण खून केल्याची घटना ६ जानेवारी रोजी दुपारी घडली होती. आरोपी विशाल यास पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून केजकडे दुचाकीवरून येत असताना रविवारी रात्री अटक केली होती. सोमवारी न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हर्षद शिंदे व आरोपी विशाल सूर्यवंशी हे एकमेकांच्या परिचयाचे होते. लहानपणी झालेल्या भांडणावरून खून केला असल्याचे आरोपीने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले.
क्षुल्लक कारणावरून खूनआरोपीने क्षुल्लक कारणावरून खून केल्याचे चौकशीत समोर आले आहे. अशाप्रकारे जर किरकोळ कारणावरून खून होत असतील तर तरुणांची मानसिकता का बिघडत चालली आहे, याचे कारण शोधणे आवश्यक आहे.- प्रवीणकुमार बांगर, पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर, बीड
Web Summary : A Beed murder case reveals a shocking motive: a childhood quarrel. Accused Vishal Suryavanshi confessed to killing Harshad Shinde due to a past dispute. Police express concern over escalating violence from minor issues and the deteriorating mindset of youth. The accused is in police custody.
Web Summary : बीड में एक हत्या का मामला सामने आया है, जिसमें बचपन के झगड़े को वजह बताया गया है। आरोपी विशाल सूर्यवंशी ने हर्षद शिंदे की हत्या की बात कबूल की। पुलिस मामूली मुद्दों से बढ़ रही हिंसा और युवाओं की मानसिकता को लेकर चिंतित है। आरोपी पुलिस हिरासत में है।