बालविवाह, बापाकडून छळाने घर सोडले; जेवणाचे आमिष दाखवून दोन नराधमांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 17:23 IST2021-11-09T17:19:14+5:302021-11-09T17:23:34+5:30

अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील अल्पवयीन विवाहिता सासरी व माहेरी होणारा छळ व लैंगिक शोषण याला कंटाळून मोरेवारी परिसरात असलेल्या बसस्थानक परिसरात भिक्षा मागुन उपजीविका करत होती.

Child marriage, sexual harassment by father, leaving home, two men raped a minor girl | बालविवाह, बापाकडून छळाने घर सोडले; जेवणाचे आमिष दाखवून दोन नराधमांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बालविवाह, बापाकडून छळाने घर सोडले; जेवणाचे आमिष दाखवून दोन नराधमांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अंबाजोगाई-:घर सोडून मोरेवाडी  बसस्थानक परिसरात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन विवाहितेस जेवण देण्याचे आमिष दाखवून दोघांनी बलात्कार केला.तर मुलीचा अल्पवयीन विवाह केल्याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील अल्पवयीन विवाहिता सासरी व माहेरी होणारा छळ व लैंगिक शोषण याला कंटाळून मोरेवारी परिसरात असलेल्या बसस्थानक परिसरात भिक्षा मागुन उपजीविका करत होती. १५ दिवसांपूर्वी अंबाजोगाई शहरातील ज्ञानदीप अकॅडमीतील हरी दराडे व ऋषीकेश दत्तात्रय सांगळे यांनी पीडित मुलीस तुला जेवायला देतोत म्हणून आडस रोडवर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
सदरील अल्पवयीन मुलीची आई ती आठ वर्षाची असतानाच मृत्यू पावली. त्यानंतर पीडितेचे शिक्षण सोडून तिच्या वडिलांनी तिचे वयाच्या १३ व्या वर्षीच बालविवाह केला. विवाहानंतर पतीही तिचा मानसिक व शारीरिक छळ करू लागला. म्हणून विवाहिता माहेरी कुंबेफळ येथे राहण्यासाठी गेली तर माहेरी ही वडिलांकडून पीडितेचा लैंगिक छळ होऊ लागला.

या सर्व प्रकाराला वैतागून पीडिता अंबाजोगाई शहरालगत असलेल्या मोरेवाडी परिसरातील बसस्थानक परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. याचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अल्पवयीन विवाहितेवर बलात्कार केल्या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून  ऋषिकेश दत्तात्रय सांगळे,हरी दराडे यांच्या विरुद्ध तर बालविवाह केल्या प्रकरणी कुटुंबातील सहाजण व विवाह लावणाऱ्या पुरोहित यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.पी.पेठकर करीत आहेत.

सामाजिक संस्थांचा पुढाकार
अल्पवयीन विवाहित पीडितेवर बलात्कार झाल्याची माहिती मानवलोकच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांना या घटनेची माहिती दिली. सर्व प्रकार समजून घेतल्यानंतर पीडितेस ग्रामीण पोलीस ठाण्यात पाठवुन गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Child marriage, sexual harassment by father, leaving home, two men raped a minor girl