मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास!
By सोमनाथ खताळ | Updated: December 5, 2023 15:53 IST2023-12-05T15:52:53+5:302023-12-05T15:53:56+5:30
परळीत पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यासंह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ गडावर जावून स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास!
- अविनाश मुडेगावकर, संजय खाकरे
बीड : परळीत मंगळवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदारांची यासाठी उपस्थिती राहणार आहे. मंगळवारी दुपारी या तिन्ही मंत्री हेलकॉप्टरमधून परळीत दाखल झाले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे देखील होत्या. यासर्वांनीच हेलिकॉप्टरमधून प्रवास केल्याचे दिसले.
बीड : परळी येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत पंकजा मुंडे यांचा एकाच हेलिकॉपटरमधून प्रवास pic.twitter.com/ZbPZFVlAiu
— Lokmat (@lokmat) December 5, 2023
परळीत पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यासंह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ गडावर जावून स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. दरम्यान, पंकजा मुंडे या मागील काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे अनेकदा जिल्हा दौऱ्यावर आले. परंतू तरीही पंकजा मुंडे यांनी त्यांची भेट घेतली नव्हती. परंतू या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही नाराजी दुर झाल्याचे दिसले. तर दुसऱ्या बाजूला मंत्री धनंजय मुंडे यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती राहणार आहे.