शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन ॲप डाऊनलोड करत केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

बीड : एका निवृत्त अधिकाऱ्याच्या तीन ठिकाणांच्या बॅंक खात्यातून पॅन नंबर विचारून घेत, ७९ हजार रुपये काढून घेतले होते. ...

बीड : एका निवृत्त अधिकाऱ्याच्या तीन ठिकाणांच्या बॅंक खात्यातून पॅन नंबर विचारून घेत, ७९ हजार रुपये काढून घेतले होते. ही घटना ताजी असतानाच, शहरतील अंकुशनगर भागात एका शेतकऱ्याला बीएसएनएलमधून बोलत असल्याचे सांगून ॲप डाऊनलोड करून घेत, २५ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याची घटना २७ मे रोजी घडली आहे.

आसाराम बापूराव खंदारे (रा.अंकुशनगर बीड ) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना मुंबई येथून एका व्यक्तीचे फोन आला. त्यानंतर, आपण मुंबई येथील बीएसएनएल केअर ऑफिसवरून विनय शर्मा बोलत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. विविध प्रकारची माहिती विचारून घेत, त्यांना बोलण्यात व्यस्त ठेवत खंदारे यांना त्यांच्या मोबाइलमध्ये ‘के.वाय.सी.क्यू.एस क्विक ॲक्शन’ हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर, काहीतरी फायदा असल्याचे सांगून ॲपवरील माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर खंदारे यांच्या बार्शी रोड परिसरातील एसबीआय बॅंक खात्यातून २५ हजार रुपये काढून घेतले. ही घटना उघडकीस आल्यानंतर खंदारे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनय शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ठाणेप्रमुख सपोनि साईनाथ ठोंबरे हे करत आहेत.

ऑनलाइन तक्रारी वाढल्या

मागील काही दिवसांपासून ऑनलाइनच्या विविध ॲप व ‘कस्टमर केअर’मधून बोलत असल्याचे सांगून, आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बॅंकेच्या खात्यासंदर्भात कोणतीही माहिती न देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सर्व गुन्ह्यांचा तपास बीड सायबर विभागाकडे वर्ग करण्यात आला असून, ते तपास करत आहेत.