शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

जिल्हा रूग्णालयात ब्रदरला मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:07 PM

सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींना केली जाणार अटक

बीड : जिल्हा रूग्णालयात अपघात विभागातील डॉक्टर हजर नाहीत, उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केल्याची घटना  ९ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजता घडली होती. उपचारानंतर जखमी ब्रदरने बीड शहर ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी चार लोकांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. 

रतन श्रिधर बडे असे मारहाण झालेल्या ब्रदरचे नाव आहे. ९ नोव्हेंबर रोजी शेख आमेर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी आक्रमक होत डॉक्टर कोणीच कसे नाहीत, कोठे गेले डॉक्टर असे म्हणत बडे यांच्यासमोरील टेबल उचलून फेकला. तसेच कागपत्रेही फाडून फेकले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अरिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी रूग्णालयात धाव घेऊन तणाव शांत केला होता. 

दरम्यान, बडे यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सायंकाळी सुट्टी होताच त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी तीन ते चार लोकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. तपास सपोनि सुरेश खाडे हे करीत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यातजिल्हा रूग्णालयातील मारहाण प्रकरण कॅमेऱ्यात कैद झाले होते. याचे सर्व फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याची चाचपणी करून आणि ओळख पटवून त्यांना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBeedबीड