शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

बीडमध्ये प्रभारीच कारभारी; आरोग्य सेवेला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:24 IST

बीड येथील जिल्हा रुग्णालयात वर्ग १ ची २० पैकी १८ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली. केवळ जिल्हा शल्य चिकित्सक आणि चर्मरोग तज्ज्ञ हीच पदे नियमित असून, बाकी सर्व विभाग हे वर्ग २ च्या तज्ज्ञांवर चालतात.

ठळक मुद्देवर्ग एकची २० पैकी १८ पदे रिक्त

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात वर्ग १ ची २० पैकी १८ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली. केवळ जिल्हा शल्य चिकित्सक आणि चर्मरोग तज्ज्ञ हीच पदे नियमित असून, बाकी सर्व विभाग हे वर्ग २ च्या तज्ज्ञांवर चालतात. जिल्हा रुग्णालयात सध्या प्रभारीच कारभारी बनल्याचे दिसून येत आहे. यामुळे कामाला गती मिळत नसल्याने आरोग्य सेवा सलाईनवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिक्त पदे भरण्यास मात्र वरिष्ठ कार्यालय उदासीन आहे.

गत काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालय वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहे. मूल अदलाबदल प्रकरण, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू अशा कारणांमुळे तर रुग्णालयाची प्रतिमा मलीन झाली आहे. केवळ हलगर्जीपणा करणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी हक्काचा अधिकारी नसल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. परंतु अद्याप त्याला यश आले नसल्याचे दिसून येते.

जिल्हा रुग्णालयात वर्ग एकची २० पदे आहेत. यापैकी केवळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, चर्मरोग तज्ज्ञ डॉ. आय. व्ही. शिंदे हे दोघेच नियमित आहेत. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकासह इतर १८ पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. अशातच डॉ. संजय पाटील यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यामुळे नेत्र चिकित्सा विभागालाही तज्ज्ञ राहिलेला नाही. सध्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक या पदाचा पदभार डॉ. शिंदे यांच्याकडे आहे.ही पदे आहेत रिक्तअतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा. स.), भिषक, शल्य चिकित्सक, स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, क्ष - किरण शास्त्रज्ञ, शरीरविकृती तज्ज्ञ, मनोविकृती तज्ज्ञ, क्षयरोग तज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, कान - नाक - घसा तज्ज्ञ, वैद्यकीय अधीक्षक (रुग्णालय प्रशिक्षण केंद्र), मनोविकृती चिकित्सक (मनोविकृती चिकित्सा कक्ष), नेत्र शल्यचिकित्सक (अंधत्व नियंत्रण कार्यक्रम), मुख्य प्रशासकीय अधिकारी यांचा रिक्त पदांमध्ये समावेश आहे.

प्रभारी आरएमओ शिंदे देखील रजेवरगत काही दिवसांपासून प्रभारी आर. एम. ओ. आय. व्ही. शिंदे हे देखील रजेवर गेले आहेत. त्यामुळे वर्ग २ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. हुबेकर यांच्याकडे आर. एम. ओ. पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आलेला आहे. हक्काचे आर. एम. ओ. नसल्याने खालील अधिकारी व कर्मचाºयांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. मनमानी कारभार चालवत रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार करण्यास हलगर्जीपणा केला जात आहे. डॉ. शिंदे यांनीही कारभार सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. शिंदे यांना त्यांच्या सहकाºयांकडून किती पाठबळ मिळते, हे वेळच ठरवेल.

हरिदास यांच्याकडे अनेक पदभारनिवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) हे पदही वर्षभरापासून रिक्त आहे. डॉ. सतीश हरिदास यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविलेला आहे. त्यातच प्रशासकीय अधिकाºयांची बदली झाल्यामुळे त्याची जबाबदारी हरिदास यांच्याकडे दिलेली आहे. तसेच विविध गैरप्रकारांच्या चौकशाही त्यांच्याकडेच आहेत. या सर्व कामातून कर्मचाºयांवर वॉच ठेवणे त्यांना जिकिरीचे बनत असल्याचे दिसून येत आहे. यावर हरिदास म्हणाले, आरोग्य सेवा कोेलमडू न देता सर्वसामान्यांवर उपचार करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

सीएस दौ-यावर जाताच कामचुकार ‘मोकार’जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात हे शस्त्रक्रिया, तपासणी, भेट, कार्यक्रम, बैठका अशा विविध कारणांमुळे अनेक वेळा बाहेर असतात. कामचुकार अधिकारी व कर्मचारी याचा फायदा उचलतात.सीएस दौºयावर गेल्याचे समजताच अनेक जण जिल्हा रुग्णालयांकडे फिरकत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यांच्याविरोधात तक्रार देण्यास कोणीही येत नसल्याने कारवाई होत नाही.अशा कामचुकारांवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरु लागली आहे.पदभरतीसाठी पाठपुरावा सुरुरिक्त पदे असले तरी आरोग्य सेवा वेळेवर व दर्जेदार देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वर्ग एकची २० पैकी १८ पदे रिक्त आहेत हे खरे असले तरी आम्ही सेवेसाठी तत्पर आहोत. पदभरतीसाठी पाठपुरावा सुरु आहे.- डॉ. अशोक थोरातजिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडMarathwadaमराठवाडा