शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परळीसाठी चांदापूर, खडका धरणातून पाणी आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:19 IST

दुष्काळामुळे यावर्षी परळी शहरात पाणीटंचाईच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी परळी नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्नशील असून नगरसेवकांनी आणि पालिकेने अधिक दक्षतेने काम करावे अशी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देधनंजय मुंडे : टंचाई जाणवू नये म्हणून पालिकेने प्रयत्न करावेत; पालिकेने दक्ष राहण्याच्या सूचना; ४० टँकरद्वारे पाणी

परळी : दुष्काळामुळे यावर्षी परळी शहरात पाणीटंचाईच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी परळी नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्नशील असून नगरसेवकांनी आणि पालिकेने अधिक दक्षतेने काम करावे अशी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.परळीसाठी चांदापूर आणि खडका प्रकल्पातून पाणी आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.मागील वर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे परळी शहराला पाणीपुरवठा करणारे नागपूरचे धरण संपूर्णपणे कोरडे पडले आहे, मृत साठ्यातून डेड स्टॉक मधून परळीकरांना पाणीपुरवठा केला जात असून आठ दिवसाआड एकदा शहराला पाणीपुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी बुधवारी नगरसेवक व पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.नागपूरच्या धरणात पाणी नसल्याने जवळपास ४० टँकरद्वारे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय अनेक नगरसेवक स्वखर्चाने आपल्या प्रभागातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा करत आहेत. याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.नाथ प्रतिष्ठानच्या वतीनेही गरजेप्रमाणे अधिक टँकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिले. नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करावा. शहरातील एकाही कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू देणार नाही, असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले. सद्यस्थितीत परळी शहराचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत.पाणीबाणी : तात्पुरती पाणीपुरवठा योजनापरळी शहरालगत असलेल्या चांदापूर धरणातून तात्पुरती पाणी पुरवठा योजना करून शहराला पाणी देता येणे शक्य आहे तसेच विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणाºया खडका येथील प्रकल्पातूनही पाणी देता येऊ शकते.या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर स्वत: मुंडे यांनी जिल्हाधिकारी, विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भातील प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्याची सूचनाही आ. धनंजय मुंडे यांनी केली.नगरसेवकांचे धनंजय मुंडे यांनी केले कौतुकपाणीटंचाईच्या कठीण काळात परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक अतिशय चांगले काम करत आहेत प्रसंगी स्वखर्चाने टँकर लावून आपल्या प्रभागातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा करत आहेत.दिवसासोबतच रात्रीही दक्ष राहून प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळेल याची स्वत: काळजी घेत आहेत याचा आवर्जून उल्लेख करताना चांगले काम करणाºया नगरसेवकांचेही मुंडे यांनी या बैठकीत स्वागत केले.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेwater shortageपाणीटंचाईDamधरण