धनगर आरक्षणासाठी माजलगावात चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:23 IST2018-08-13T16:22:17+5:302018-08-13T16:23:57+5:30
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अमंलबजावणी करण्यासाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला.

धनगर आरक्षणासाठी माजलगावात चक्का जाम
माजलगाव (बीड) : धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अमंलबजावणी करण्यासाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला. शहरातील संभाजी चौक ते परभणी फाटा याठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात अमंलबजावणी करण्यात यावी यासाठी माजलगांव बंद व चक्काजामची हाक धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने देण्यात आली होती. अहिल्याबाई होळकर चौक ते परभणी फाटापर्यंत समाज बांधवांनी रॅली काढत बंदचे आवाहन केले. यानंतर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.