बीड जिल्हा रुग्णालयात रक्त विक्री करणाऱ्यांची साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 11:49 PM2020-02-06T23:49:46+5:302020-02-06T23:50:32+5:30

जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतील सावळ्या गोंधळाबद्दल रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रक्त विक्री करणा-यांची साखळीच सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे.

Chains of Blood Sellers at Beed District Hospital | बीड जिल्हा रुग्णालयात रक्त विक्री करणाऱ्यांची साखळी

बीड जिल्हा रुग्णालयात रक्त विक्री करणाऱ्यांची साखळी

Next
ठळक मुद्देरक्ताचा बाजार : सेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह दलालांचा समावेश; चौकशी करण्याची होतेय मागणी

बीड : जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतील सावळ्या गोंधळाबद्दल रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रक्त विक्री करणा-यांची साखळीच सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सेवकांपासून ते अधिकारी, कर्मचारी आणि काही खाजगी लोकांचा समावेश असल्याची चर्चा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा बाजार मांडला जात असताना वरिष्ठही मूग गिळून गप्प असल्याने संशय व्यक्त होत आहे.
रक्तदान करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सामान्यांना वेळेवर रक्त उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असते. परंतु जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तदान केल्यानंतर कार्ड असतानाही अनेकदा रक्त पिशवी भेटत नाही. दुसरा दाता देऊन रक्त घ्यावे लागते. तर मागील काही दिवसांत तर कार्ड देणेच बंद केले आहे. उपलब्धता नाही, असे सांगत कार्डची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचे समोर आले होते. हे कार्ड आयोजक व दात्यांना न सांगता परस्परच विक्री करून ‘रक्ताचा पैसा’ कमावल्याचा आरोप केला जात आहे. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतरही वरिष्ठांकडून याबाबत अद्याप कसलीच चौकशी केल्याचा खुलासा सादर झालेला नाही. त्यामुळे यात वरिष्ठांचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. ज्यांच्याकडे कार्ड नाही, अशांकडून पैसे घेत आपल्या जवळील कार्डचा वापर करून पैसे खिशात घातले जातात.
ही सर्व ‘प्रक्रिया’ यशस्वीपणे पार पाडण्यात रक्तपेढीतील कर्मचारी आणि खाजगी लोक सहभागी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रक्त घेण्यासाठी आलेल्या लोकांना ‘भुलवणारी’ जणू टोळीच रुग्णालयात सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. या रक्त विक्रीतून येथील अधिकारी, कर्मचा-यांनी आर्थिक कमाई केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, बाजू समजुन घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना संपर्क केला.परंतु त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी सांगितले की माझ्याकडून पत्र काढले नाही. शल्य चिकित्सकांनी काढले असेल तर विचारावे लागेल.
राज्य रक्त संक्रमण संचालकांकडे तक्रार
बीडच्या रक्तपेढीत शिबिरे घेऊन रक्तदान केल्यानंतरही कार्ड दिलेले नाहीत. हाच धागा पकडून काही आयोजक थेट राज्याच्या संचालकांकडे तक्रार करणार आहेत. विशेष म्हणजे, रक्ताचा बाजार मांडणा-या अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करावी, तसेच रक्त विक्री करणाºया साखळी थांबवावी, अशी मागणी आयोजकांमधून केली जात आहे.

Web Title: Chains of Blood Sellers at Beed District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.