सिंमेंट रस्त्याला पडल्या भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST2021-03-13T05:00:18+5:302021-03-13T05:00:18+5:30
पिकांवर आले रोगराईचे संकट अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या एक आठवड्यापासून उष्णता जाणवत आहे. या वातावरणामुळे गहू, हरभरा, या ...

सिंमेंट रस्त्याला पडल्या भेगा
पिकांवर आले रोगराईचे संकट
अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या एक आठवड्यापासून उष्णता जाणवत आहे. या वातावरणामुळे गहू, हरभरा, या पिकांना रोगराईचा फटका बसू लागला आहे. वातावरणातील बदलाचा शेतकऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. वातावरणात असे बदल झाल्यानंतर महागडी कीटकनाशके पिकांवर फवारणी करावी लागतात.
सिद्धेश्वर कॉलेजमध्ये विज्ञान दिन सप्ताह
बीड : माजलगाव येथील भाशिप्र संस्था अंबाजोगाई संचलित श्री. सिद्धेश्वर महाविद्यालयाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. उद्घाटन संस्थाध्यक्ष प्रकाश दुगड, अभय कोकड, प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड, उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना, प्रा. संतोष लिंबकर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व आणि सप्ताहाची संकल्पना स्पष्ट केली.
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था
बीड : बीड बायपासचे काम पूर्णत्वास जाऊन दोन वर्षे उलटून गेलेली असताना शहरवासीयांना लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. बीड शहरातून जाणारा मुख्य रस्ता काम होणे अपेक्षित असताना याकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा होत असल्याचे दिसते.