राफेल घोटाळा दडपडण्यासाठी सीबीआयचे संचालक सक्तीच्या रजेवर : खरगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:14 IST2018-11-02T00:12:02+5:302018-11-02T00:14:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल घोटाळा आपल्या अंगलट येतो की काय असे वाटल्याने तो दडपण्यासाठी सीबीआय सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेत पंतप्रधानांनी ढवळाढवळ करून सीबीआयच्या संचालकांना रात्रीतून सक्तीच्या रजेवर पाठवले. आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी गैरकृत्य केले नव्हते. ते मोदींनी केले. असा घणाघाती आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

राफेल घोटाळा दडपडण्यासाठी सीबीआयचे संचालक सक्तीच्या रजेवर : खरगे
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : गेल्या साडेचार वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आश्वासनांची खैरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल घोटाळा आपल्या अंगलट येतो की काय असे वाटल्याने तो दडपण्यासाठी सीबीआय सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेत पंतप्रधानांनी ढवळाढवळ करून सीबीआयच्या संचालकांना रात्रीतून सक्तीच्या रजेवर पाठवले. आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी गैरकृत्य केले नव्हते. ते मोदींनी केले. असा घणाघाती आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
अंबाजोगाईत गुरुवारी काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रेत ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खा. रजनीताई पाटील, माजी मंत्री सुरेश नवले, अशोकराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ. सिराज देशमुख, डॉ. नारायण मुंडे, टी. पी. मुंडे, नगराध्यक्षा रचना मोदी, केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती राजेसाहेब देशमुख, डॉ. अंजली घाडगे, संजय दौंड व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. खरगे म्हणाले की, केंद्रात व राज्यात सत्ता असलेले भाजप जनतेची घोर फसवणूक करत आहे. जनतेवर सुरू असलेल्या अन्यायाच्या विरोधातच काँग्रसेने जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. केंद्र व राज्यातील सरकार हटविण्यासाठी काँग्रेसला ताकद द्या. असे आवाहन त्यांनी केले. जनतेला भूलथापा मारून त्यांची घोर फसवणूक केली. मोदींच्या काळात देशाची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. ११ लाख कोटी रुपये नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहता व इतरांनी लुटून बँका उद््धवस्त केल्या. या आरोपींना सरकार काहीही करू शकले नाही. मोदी यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यांच्या या सामाजिक गुलामगिरीला लोक वैतागले असल्याचे खरगे म्हणाले.
चौकीदारच निघाला चोर
मोदी हे स्वत:ला जनतेचा सेवक समजतात. सेवक म्हणून ही तुमची सेवा करत आहे. असे भासवून चौकीदारच खरा चोर निघाला अशीच त्यांची स्थिती झाली आहे. त्यांच्या विविध भूलथापांमुळे शेतकरी, व्यापारी, बेरोजगार देशोधडीला लागले आहेत. सेवकाचे ढोंग करणाऱ्या मोदींना त्यांची जागा दाखवून द्या अशा शब्दात खा. खरगे यांनी मोदींवर तोफ डागली.