अंबाजोगाईतून काजू, बदाम चोरणाऱ्यास परळीमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:09 AM2020-01-11T00:09:09+5:302020-01-11T00:09:40+5:30

अंबाजोगाई येथील एक किराणा दुकान फोडून काज, बदाम व इतर साहित्य चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगलसिंग हिरासिंग बावरी यास परळीत जेरबंद केले.

Cashew nuts from Ambajogai arrested in Parli | अंबाजोगाईतून काजू, बदाम चोरणाऱ्यास परळीमध्ये अटक

अंबाजोगाईतून काजू, बदाम चोरणाऱ्यास परळीमध्ये अटक

Next
ठळक मुद्देगुन्ह्यासाठी गंगाखेडमधून चोरले होते वाहन : दोघांचा शोध सुरु

बीड : अंबाजोगाई येथील एक किराणा दुकान फोडून काज, बदाम व इतर साहित्य चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगलसिंग हिरासिंग बावरी यास परळीत जेरबंद केले.
८ जानेवारी रोजी अंबाजोगाई येथील किराणा दुकानातील चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्याबात वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीआधारे या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परळी गाठली. परळीच्या शिवाजी चौकातील मंगलसिंग हिरासिंग बावरी (वय १९) यास शिताफिने ताब्यात घेतले. अंबाजोगाईतील किराणा दुकानातील चोरीचा गुन्हा त्याने व दोन साथीदारांनी मिळून केल्याची कबुली दिली. त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी राहुल धस, पो. नि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था. गुन्हे शाखेचे मुंजाबा कुव्हारे, सोजद पठाण, नरेंद्र बांगर, सिद्दीकी, सखाराम पवार, अतुल हराळे यांनी ही कामगिरी केली.
एका तपासात दुसºया चोरीचा उलगडा
अंबाजोगाई येथील गुन्हा करण्यासाठी मंगलसिंग व साथीदारांनी गंगाखेड येथून मालवाहू वाहन चोरले. तसेच गंगाखेड येथील एका कापडाच्या दुकानात चोरी केल्याचे मंगलसिंगने अधिक चौकशीत सांगितले. सदर वाहनही जप्त करण्यात आले असून आरोपीला अंबाजोगाई शहर ठाण्याकडे सोपविले आहे.

Web Title: Cashew nuts from Ambajogai arrested in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.