मिरा एखंडे मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:36 IST2019-01-07T15:34:59+5:302019-01-07T15:36:17+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे या मातेचा नवजात बालकासह मृत्यू झाला होता.

मिरा एखंडे मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
माजलगाव (बीड ) : मीरा एखंडे व नवजात बालकाच्या प्रसूतीदरम्यान मृत्यू प्रकरणी दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज सकाळी सर्वपक्षीय, संघटनांनी उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढला.
येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे या मातेचा नवजात बालकासह मृत्यू झाला होता. हा मृत्यू बेजबाबदारपणामुळेपणामुळे झाल्याचा आरोप करत सबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शहरातून आज सकाळी सर्वपक्षीय संघटनांनी मूक मोर्चा काढला.
हनुमान चौकातून निघालेल्या या मोर्चात शिवसेना, भारिप बहुजन महासंघ, संभाजी ब्रिगेड, रिपाई, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, मानवी हक्क अभियान, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवा संघटना, विविध विद्यार्थी संघटना आदींचा सहभाग होता. आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांच्याकडे निवेदन सादर केले. विशेष म्हणजे या मूक मोर्चात मीरा एखंडे यांच्या सात मुली सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या सहभागाने अनेकांची अनेकांची मने हेलावली.