भरधाव कारची रिक्षाला पाठीमागून धडक; दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 19:04 IST2020-01-04T18:57:46+5:302020-01-04T19:04:16+5:30
गेवराई जवळ भरधाव वेगातील कारने दिली धडक

भरधाव कारची रिक्षाला पाठीमागून धडक; दोघांचा मृत्यू
गेवराई : प्रवाशी रिक्षाला पाठीमागून आलेल्या कारने जोराची धडक दिली या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवार रोजी दुपारी मादळमोही जवळ घडली.
मादळमोही येथून पाडळसिंगीकडे प्रवाशी घेवून रिक्षा एम.एच. 20 यू 4157 जात होता . यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या कार क्रमांक एम.एच. 21 ए.एक्स - 5303 ने जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक आसेफ इसाक मोमीन वय 45 राहणार मादळमोही, सनिल रंगनाथ शिंगाडे वय 35 रा.श्रंगारवाडी ता.शिरुर या दोघांचा जागीच मृत्यू झाला.तर शेख सत्तार शेख आसेफ, विकास नारायण कोळेकर,शरद खंडू कोळेकर , जगन्नाथ बनगर , द्वारकाबाई बनगर हे प्रवाशी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे सपोनि राजाराम तडवी, पोहेकॉ सोनवणे, पोना गुरखुदे, प्रविण ओळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.