ताबा सुटल्याने कार उलटली; चालक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 14:37 IST2020-07-18T14:36:29+5:302020-07-18T14:37:09+5:30
आष्टी तालुक्यातील कडा- धामणगाव रोडवरील घटना

ताबा सुटल्याने कार उलटली; चालक जागीच ठार
कडा : कडा - धामणगा रस्त्यावर शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कारच्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ताबा सुटल्याने कार उलटली आणि यात चालक कृष्णा दत्तु लोखंडे ( २२ ) हा मृत झाला.
धामणगाव येथील कृष्णा लोखंडे शुक्रवारी रात्री कड्यावरून धामणगाव कडे कारने ( एम.एच. 14, एफ.सी. 3082 ) येत होता. धामणगाव जवळील एका वळणावर कृष्णाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे कार उलटली. यात कृष्णा जागीच ठार झाला. याप्रकणी अंभोरा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पी.एन.राठोड करत आहेत.