माजलगाव येथे उसाच्या ट्रकला कारची धडक; एक जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:34 IST2018-01-24T17:34:20+5:302018-01-24T17:34:47+5:30
नगरहून परळीकडे जाणा-या कारने उस वाहतुक करणाऱ्या उभ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात नगर येथील युवक जागीच ठार झाला.

माजलगाव येथे उसाच्या ट्रकला कारची धडक; एक जण जागीच ठार
माजलगाव (बीड) : नगरहून परळीकडे जाणाऱ्या कारने उस वाहतुक करणाऱ्या उभ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात नगर येथील युवक जागीच ठार झाला. किरण काळाराम माने (36,तपोवन नगर सावेडी,अहमदनगर) असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून ही घटना आज पहाटे केसापुरी कँम्प जवळ घडली.
किरण माने हा एका खाजगी कंपनीत नोकरीस होता. तो आज पहाटे नगरकडून परळीकडे आपल्या कारने ( क्र.एम.एच.16 बि.एच.939 ) जात होता. या दरम्यान शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी कँम्पजवळ रोडच्या बाजूस उभ्या असलेल्या उस वाहतूक करणाऱ्या ट्रकला ( क्र.एम.एच.18 बी.7389) त्याच्या कारने भरधाव वेगात धडक दिली.
अपघात एवढा जबरदस्त होता कि, कार ट्रकच्या मागील बाजूस अर्ध्यापेक्षा जास्त आत अडकलेली होती. तसेच दोन्ही एअर बँगही यात फुटल्या गेल्या. यामुळे स्वतः गाडी चालवत असलेला किरण यात जागीच ठार झाला. ही घटना पहाटे माँर्निग वाँकसाठी गेलेल्या लोकांच्या निदर्शनास आली असता त्यांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. या प्रकरणी पो.हे. सय्यद खलील सय्यद जमील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला आहे.