आष्टीत चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली; एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 13:16 IST2019-12-27T13:15:11+5:302019-12-27T13:16:50+5:30
अपघातात दोघे गंभीर जखमी आहेत

आष्टीत चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली; एकजण जागीच ठार
आष्टी : तालुक्यातील पोखरी जवळ शुक्रवारी (ता.२७) पहाटेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.
जामखेड-आष्टी महामार्गावर झालेल्या या अपघातात चारचाकीमध्ये (क्र.एम.एच.16 ए.क्यु 5050) चालक आणि दोन प्रवासी होते. आष्टी तालुक्यातील पोखरी नजीक आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे चारचाकी पोखरी येथील पुलानजीक खाली उतरुन झाडावर जोराने आदळली. चालक विशाल उर्फ बंटी काकासाहेब पवार (वय वर्ष 30 रा.जामखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. पवन गायकवाड (वय 31 रा.जातेगाव), आकाश अभिमन्यू उगले (वय 32, रा. पोलीस स्टेशन जवळ, जामखेड) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे.