भरधाव कारने दुचाकीला उडवले; एकजण जागीच ठार, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 13:59 IST2021-01-06T13:58:03+5:302021-01-06T13:59:16+5:30
Acccident in Beed लग्न समारंभासाठी जातांना काळाचा घावा

भरधाव कारने दुचाकीला उडवले; एकजण जागीच ठार, दोघे जखमी
ठळक मुद्देबीड धामणगांव नगर रोडवरील घटना
कडा- नगरहून बीडला जात असलेल्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता घडली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. हा अपघात धामणगांव नगर रोडवरील सांगवी पाटण येथे झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ गोल्हार हे सून आणि नातवासोबत कापशी येथून धामणगांव येथे लग्न समारंभासाठी दुचाकीवरून जात होते. यावेळी नगरहून येणारी भरधाव कार ( MH06,AF 2198 ) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात एकनाथ गोल्हार हे जागीच ठार झाले. तर त्यांची सून आणि नातू गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरुन फरार आहे.