कार-दुचाकी अपघात; १ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:55 IST2019-11-15T23:54:29+5:302019-11-15T23:55:08+5:30

तालुक्यातील गाढेपिंपळगाव फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी कार व दुचाकी अपघातात अनिकेत आव्हाड (वय २५, रा. परळी) नामक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे.

Car-bike accident; 1 killed | कार-दुचाकी अपघात; १ ठार

कार-दुचाकी अपघात; १ ठार

परळी : तालुक्यातील गाढेपिंपळगाव फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी कार व दुचाकी अपघातात अनिकेत आव्हाड (वय २५, रा. परळी) नामक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे.
परळी -बीड राज्य रस्त्यावरील गाढेपिंपळगाव फाट्याजवळ पुलाचे कठडे तोडून कार (एमएच २३ एडी १४५३) खाली नदीच्या पात्रात पडली. अपघातानंतर कार चालक फरार झाला. कारची धडक बसल्याने आव्हाड हा गंभीर जखमी झाला. त्यास अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आव्हाड याच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी आहेत. सिरसाळा ठाण्यात गुन्हा नोंदवल्याचे समजते. परंतु पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली नाही.

Web Title: Car-bike accident; 1 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.