Video: ५० जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण, आष्टीत मनोज जरांगेंचे ग्रँड स्वागत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 19:51 IST2023-10-06T19:51:21+5:302023-10-06T19:51:57+5:30
येत्या १४ तारखेला आंतरवाली येथे मराठा समाजाची सभा होणार आहे.

Video: ५० जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण, आष्टीत मनोज जरांगेंचे ग्रँड स्वागत!
- नितीन कांबळे
कडा - आष्टी शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले आहे. जरांगे यांचे सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आगमन झाले. यावेळी रोडच्या बाजूने उभा असलेल्या ५० जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत जरांगे यांचे स्वागत करण्यात आले.
५० जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण, आष्टीत मनोज जरांगेंचे ग्रँड स्वागत ! pic.twitter.com/8Z305p041k
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 6, 2023
मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या सभेच्या रूपाने आरक्षणाची मशाल पेटणार आहे. आरक्षण मिळावे या मागणीसह समाजाच्या इतर मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सरकारला जरांगे यांनी दिलेला चाळीस दिवसांचा वेळ संपत आलेला आहे. मराठा समाजात पुन्हा एकदा आंदोलनाची धग पेटवण्यासाठी जरांगे यांची ही सभा अत्यंत महत्वाची ठरणार आहे. येत्या १४ तारखेला आंतरवाली येथे मराठा समाजाची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्या अनुषंगाने आज आष्टी येथेसभेचे आयोजन करण्यात आले आहे.