शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

धारूर घाटात दुचाकी बस अपघात, वृद्ध महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:42 AM

येथून सोनीमोहाकडे जाताना घाटात दुचाकी, बस, कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील वृध्देचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धारूर घाटामध्ये सोमवारी ५ वाजता घडली. दुचाकीस्वार जखमी झाली असून त्याच्यावर धारूर रुग्णालयात उपचार करून स्वराती रूग्णालय अंबाजोगाई येथे उपचार करण्यात येत आहेत .

धारुर : येथून सोनीमोहाकडे जाताना घाटात दुचाकी, बस, कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील वृध्देचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धारूर घाटामध्ये सोमवारी ५ वाजता घडली. दुचाकीस्वार जखमी झाली असून त्याच्यावर धारूर रुग्णालयात उपचार करून स्वराती रूग्णालय अंबाजोगाई येथे उपचार करण्यात येत आहेत .शिवकांता गणपती सातभाई (वय ६० वर्षे, रा. तडोळी, ता. पसळी) असे मयत महिलेच नाव आहे. मच्छिंद्र भाऊराव तोंडे (रा. सोनीमोहा) हा जखमी झाला आहे. शिवकांता सातभाई या आसोला येथे मुलीस भेटण्यास आठ दिवसांपूर्वी आल्या होत्या. आसोला येथे आठ दिवस थांबून परत जात असतांना धारूर येथे सोनीमोहा येथील नातजावई मच्छिंद्र तोंडे यांची भेट झाली. त्यांच्यासोबत नातीस भेटण्यास सोनीमोहा येथे दुचाकी (एम.एच.४४-८२८५) वरुन जात होत्या.धारूर घाटात दुचाकीला एका कंटेनरची धडक झाली. यावेळी शिवकांता या दुचाकीवरून रस्त्यावर पडल्या. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एस.टी. बस (एमएच २०/००६८) चे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे मच्छिंद्र तोंडे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रूग्णालय दाखल केले आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यू