पाटोद्यात पैशाच्या व्यवहारातून सराफा व्यापाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:41 IST2019-05-16T00:40:16+5:302019-05-16T00:41:09+5:30
पैशाच्या व्यवहारातून एका सराफा व्यापाºयास मारहाण झाल्याची घटना पाटोदा शहरात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आठ जणांविरोधात पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पाटोद्यात पैशाच्या व्यवहारातून सराफा व्यापाऱ्यास मारहाण
पाटोदा : पैशाच्या व्यवहारातून एका सराफा व्यापाºयास मारहाण झाल्याची घटना पाटोदा शहरात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आठ जणांविरोधात पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक वसंत नेमाने (३४, रा. चुंबळी फाटा, ता. पाटोदा) असे मारहाण झालेल्या व्यापाºयाचे नाव आहे. त्यांचे पाटोदा शहरात दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता ८ जण त्यांच्या दुकानात घुसले. खंडू उर्फ बंटी सगळे याने ह्यमाज्या वडिलांनी तुज्याकडून घेतलेले पैसे मी तुला देणार नाहीह्ण असे म्हणत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
सोबत असलेल्या सुभाष सगळे याने लोखंडी चेन हातात घेऊन शिवीगाळ केली. यावेळी जिवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी अशोक नेमाने यांच्या तक्रारीवरुन खंडू उर्फ जालिंदर सगळे, शिवा उर्फ डाग्या सगळे, मच्छिंद्र अशोक सगळे, सुभाष सगळे, बंटीचा वाहनचालक सचिन (पूर्ण नाव माहीत नाही ) व इतर अनोळखी दोन ते तीन (सर्व रा. सगळेवाडी ता. पाटोदा) यांच्याविरुध्द पाटोदा ठाण्यात गुनहा नोंद करण्यात आला.
दरम्यान, ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली आहे. हे फुटेज नेमाने यांनी पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले आहे.