बसचालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:19 IST2020-01-15T00:18:34+5:302020-01-15T00:19:04+5:30
एस.टी. महामंडळात बसचालक म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाºयाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान उघडीस आली.

बसचालकाची आत्महत्या
बीड : एस.टी. महामंडळात बसचालक म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाºयाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान उघडीस आली.
चंद्रकांत काशीनाथ ठोकळ (वय ३५, रा.तक्षशीलनगर धानोरा रोड, बीड) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाºयाचे नाव आहे. ठोकळ हे येथील आगारात चालक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी बाहेर गावी गेलेल्या होत्या. मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास राहत्या घरात चंद्रकांत ठोकळ यांनी घरातच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आली, याप्रकरणी नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलिसांना माहिती देत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. घटनास्थळी शिवाजीनगर ठाण्यातील पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. चंद्रकांत ठोकळ यांच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. शिवाजीनगर ठाण्यात नोंद झाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.