Bus-bike accident; The lawyer was killed on the spot | बस-दुचाकी अपघात; वकील जागीच ठार
बस-दुचाकी अपघात; वकील जागीच ठार

गेवराई : तालुक्यातील माटेगावहून गेवराईकडे येणाऱ्या मोटारसायकलला समोरून येणाºया बसने जोराची धडक दिली. यात एका वकिलाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी १० वाजता पाढंरवाडी फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली.
धर्मराज कल्याणराव चव्हाण (वय ३७, रा.माटेगाव) असे अपघातात ठार झालेल्या वकिलाचे नाव आहे. ते गेवराई न्यायालयात वकिली करत होते. गुरूवारी सकाळी दुचाकीवरुन (एमएच २३/पी २०१३) माटेगावहून गेवराईकडे येत असताना राष्ट्रीय महामार्गावर पांढरवाडी फाट्याजवळ समोरुन येणारी बस (एम.एच १४/ बीटी १५७६) ने जोराची धडक दिली. यात चव्हाण हे जागेवरच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघात झाल्यानंतर बस येथील आगारात लावण्यात आली असून दुचाकी घटनास्थळीच आहे.

Web Title: Bus-bike accident; The lawyer was killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.