दि बर्निंग बस; नगर रोडवर धावत्या लक्झरी बसला आग,सर्व प्रवासी सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 08:39 IST2019-12-27T08:38:53+5:302019-12-27T08:39:42+5:30

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील मध्यरात्रीच्या थरार

The Burning Bus; Traveling on the Nagar road travel bus burned down, all the passengers are safe | दि बर्निंग बस; नगर रोडवर धावत्या लक्झरी बसला आग,सर्व प्रवासी सुखरूप

दि बर्निंग बस; नगर रोडवर धावत्या लक्झरी बसला आग,सर्व प्रवासी सुखरूप

कडा : नांदेडवरून 34 प्रवासी यांना घेऊन पुण्याला जात असलेल्या एका खाजगी लक्झरी बसला अचानक आग लागुन ती  जळून खाक झाली. तर चालकांच्या प्रसंगवधानाने सर्व सुखरूप आहेत. ही घटना आष्टी तालुक्यातील बीड धामणगाव नगर रोडवरील सांगवी पाटण येथे शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली.

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे शुक्रवारी पहाटे दोन वाजता प्रवाशांनी भरलेली MH 20  N 9630, ही शर्मा ट्रॅव्हल्स ची  लक्झरी बस नांदेडवरून पुण्याला चालली असताना तिने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. पण चालकांच्या प्रसंगवधानाने सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर पडले असून बस जळून खाक झाली आहे. नशिब बलवत्तर म्हणून ही दुर्दैवी घटना टळली नसता चित्र वेगळे झाले असते.

ही घटना घडताच काही मिनिटांत कडा पोलीस चौकीचे कर्मचारी  घटनास्थळी पोहोचले पण तो पर्यंत बस जळाली होती. या  बसने का पेट घेतला त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चालक अशोक कचरू बोराडे रा. परभणी यांना कडा पोलीस चौकी येथे पोलिस घेऊन गेले आहेत. 

Web Title: The Burning Bus; Traveling on the Nagar road travel bus burned down, all the passengers are safe