शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

जन्मदात्या बापावर मुलाने झाडल्या गोळ्या; आईला मारहाण केल्याच्या संतापात कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 12:50 PM

दोन गोळ्या पोटावर झाडण्यात आल्याने वडील गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यांपूर्वी झाले होते सैन्य दलातून निवृत्तदारू पिऊन आईला मारहाण केल्याने संतापला मुलगा

आष्टी (जि. बीड): आष्टी शहरातील विनायकनगर भागामध्ये जन्मदात्या बापावर मुलाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना २० मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. आष्टी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष किसन लटपटे (वय ५०) असे जखमी पित्याचे नाव असून, ते माजी सैनिक आहेत. त्यांच्यावर मुलगा असलेल्या किरण संतोष लटपटे (२४) याने घरगुती वादातून बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर झाडण्यात आल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते. यातून घरात सातत्याने छोटे-मोठे वाद होत असत. या वादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

तीन महिन्यांपूर्वी झाले होते सैन्य दलातून निवृत्तसंतोष लटपटे हे तीन महिन्यांपूर्वी सैन्य दलातून निवृत्त झाल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता. गुरुवारी सायंकाळी या बंदुकीतूनच पोटच्या मुलाने तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या या त्यांच्या पोटात गेल्या, तर एक गोळी हुकली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वडील संतोष लटपटे यांनी दारू पिऊन आपल्या आईला मारहाण सुरू केली होती. आईला मारहाण झाल्याने राग अनावर झाल्याने गोळ्या झाडल्याचे किरण लटपटे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड