Brother murdered by crushed stone | दगडाने ठेचून भावाचा केला खून
दगडाने ठेचून भावाचा केला खून

ठळक मुद्देदोघेही होते मद्यधुंद : पाटोदा ममदापूर येथील घटना

अंबाजोगाई : मद्यधुंद दोन भावामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन लहान भावाने मोठ्या भावाची घरासमोरच दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथे रविवारी सायंकाळी घडली.
विलास मोहन यशवंत (वय ५०, रा. पाटोदा म.) असे मयताचे नाव आहे. विलास आणि त्यांचा लहान भाऊ बंडू या दोघांनीही रविवारी सायंकाळी मद्य प्राशन केले होते. त्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास दोघांमध्ये त्यांच्या राहत्या घरासमोर कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. अल्पावधीतच या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या भांडणात झटापटीनंतर अचानकपणे बंडूने दगडाने मारहाण करायला सुरुवात केली. ही मारहाण एवढी मोठी होती की विलासचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राहुल धस, ग्रामीणचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत, सपोनि सावंत, पीएसआय मनीषा लटपटे, पो.ह. माऊली बडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी बंडू मोहन यशवंत याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Brother murdered by crushed stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.