बाथरूममधील व्हिडिओ शूट केला, व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर दिरांचा अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 18:03 IST2023-02-06T18:01:42+5:302023-02-06T18:03:12+5:30
नात्याला काळिमा, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत भावजयीवर दोन दिरांचा अत्याचार

बाथरूममधील व्हिडिओ शूट केला, व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर दिरांचा अत्याचार
गेवराई : शहरातील तय्यब नगर भागात राहणाऱ्या एका विवाहितेवर तिच्या दोन दिरांनी बलात्कार केल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पिडीतेच्या फिर्यादीनुसार, पाच ते सहा महिन्यांपूर्वी पती बाहेर गेल्यानंतर मोठा दीर जेवणासाठी घरी आला. जेवण दिल्यानंतर दिराने आवाज देत बोलावून घेत मोबाईलमध्ये मध्ये एक व्हिडिओ दाखवला. तो विवाहिता अंघोळ करतानाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत याने शारीरिक सुखाची मागणी केली. विवाहितेने सगळा प्रकार सासऱ्यांना सांगितला. परंतु त्यांनी विश्वास ठेवला नाही. उलट माझ्या मुलावर माझा विश्वास आहे असे सांगून वेळ मारून नेली.
त्यानंतरही घरी एकटे असल्याचे गैरफायदा घेत दिराने अत्याचार केला. काही दिवसांनी मावस दिरास घरी आणून त्याने गाडी घेण्यासाठी मदत केल्याने त्याच्यासोबत संबंध ठेव असे सांगितले. नकार देताच मावस दिराने देखील अत्याचार केला. त्यानंतर पिडीतेने आई-वडिलांना याची माहिती दिली. त्यांच्या मदतीने पिडीतेने गेवराई पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर हे करत आहेत.