बीडमध्ये भर रस्त्यात वऱ्हाडाच्या बसचे ब्रेक फेल; एक किलोमीटरपर्यंत अनियंत्रीत धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 15:44 IST2018-05-07T15:44:46+5:302018-05-07T15:44:46+5:30
लग्नासाठी वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचे ब्रेक फेल झाल्यानंतर एक किलोमीटरपर्यंत जाणारी बस एका टेम्पोला धडकल्यानंतर थांबली.

बीडमध्ये भर रस्त्यात वऱ्हाडाच्या बसचे ब्रेक फेल; एक किलोमीटरपर्यंत अनियंत्रीत धावली
बीड : लग्नासाठी वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचे ब्रेक फेल झाल्यानंतर एक किलोमीटरपर्यंत जाणारी बस एका टेम्पोला धडकल्यानंतर थांबली. दरम्यान, या रस्त्यावरुन जाणाऱ्या अन्य एका लग्नाच्या परण्या मिरवणुकीतील सतर्क तरुणांमुळे मोठी हानी टळली. आज दुपारी दीडच्या सुमारास शहरातील नाळवंडी नाका ते तेलगल्लीपर्यंत हा थरार परिसरातील लोकांनी अनुभवला.
तरुणांच्या सतर्कतेमुळे आणि बस चालकाच्या हुशारीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सहा वाहनांचे नुकसान झाले. या घटनेनंतर परिसरात एकच गर्दी झाली. तीन वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याच रस्त्यावर पेठ बीड पोलीस ठाणे आहे. मात्र, ही घटना घडल्यानंतरही पोलीस उशिरा पोहचले.