रस्त्यावर चूल पेटवून भाजल्या भाकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:53+5:302021-07-07T04:41:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केज : शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीविरोधात ...

Bread baked on the street | रस्त्यावर चूल पेटवून भाजल्या भाकरी

रस्त्यावर चूल पेटवून भाजल्या भाकरी

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले. यावेळी रस्त्यावर चूल मांडत, चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी ११ वाजता हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार दुलाजी मेंढके यांना देण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादीचे केज तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे, नवाब मामू, विलास जोगदंड, नारायण शिंदे, रमेश शिंदे, बालासाहेब बोराडे, भाऊसाहेब गुंड, नारायण शिंदे, उमाकांत भुसारी, शरीफभाई सय्यद, सूरज खोडसे, विश्वनाथ गायकवाड, पद्माकर सावंत, शाम चटप व कार्यकर्ते उपस्थित होते.

....

धरणे आंदोलनाने रस्ता जाम

राष्ट्रवादी काँग्रेसने महागाईच्या विरोधात केज शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तास धरणे आंदोलन केले. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

050721\img_20210705_112436.jpg

राष्ट्रवादी काँग्रेसने केजमध्ये महागाईच्या विरोधात धरणे आंदोलन  केले. गॅसच्या दरात वाढ झाल्याने रस्त्यावर चूल मांडत चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

Web Title: Bread baked on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.