पराभव दिसल्याने निवडणुकीवर बहिष्कार, भाजपचे दुर्दैव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:33 IST2021-03-20T04:33:06+5:302021-03-20T04:33:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडवणी : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदार संघातील ११ जागांवर उमेदवार ठेवण्याच्या ...

पराभव दिसल्याने निवडणुकीवर बहिष्कार, भाजपचे दुर्दैव
लोकमत न्यूज नेटवर्क
वडवणी : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदार संघातील ११ जागांवर उमेदवार ठेवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना अगदी सर्वोच्च न्यायालयातदेखील यश न आल्याने आता उर्वरित जागांसाठीच्या मतदानावरच बहिष्कार टाकण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. पराभव समोर दिसल्याने माजी मंत्र्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला, हे भाजपचे दुर्दैव आहे, असे मत आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. भाजपचे माजी आमदार केशव आंधळे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार सोळंके यांनी जिल्हा बँक राजाभाऊ मुंडे यांच्यामुळेच डबघाईला आल्याचा आरोप केला. केशव आंधळे महाविकास आघाडीमध्ये आल्याने आम्हाला एक संधी मिळाली आहे. जिल्हा बँकेचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी महाविकास आघाडीला मतदारांचा प्रतिसाद असून, जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार आंधळे म्हणाले, पंकजा मुंडे व माझे कौटुंबिक संबंध आहेत. सहकार बॅंकेची निवडणूक ही पक्षावर नसते. बँकेची प्रगती व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्यासाठी मी महाविकास आघाडीमध्ये आहे. आगामी नगर पंचायत निवडणूक ही महाविकास आघाडीमध्ये पूर्ण ताकतीने लढणार आहे. तूर्तास तरी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नसल्याचे ते म्हणाले. यावेळी बन्सी मुंडे, माजी सभापती दिनकर आंधळे, दादासाहेब मुंडे, सभापती दिनेश मस्के, बजरंग साबळे, प्रशांत सावंत, गंपू पवार, भीमराव उजगरे, संभाजी शिंदे, सुभाष सावंत, सतीश बडे उपस्थित होते.
===Photopath===
190321\rameswar lange_img-20210319-wa0021_14.jpg