शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

दशक्रिया विधीसाठी गेलेल्या तरूणाचा गोदावरीत बुडून मृत्यु, 24 तासानंतर मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 3:57 PM

विधीनंतर नदीच्या पाण्यात अंघोळ करतांना भास्कर नदीत बुडाला. यावेळी त्याचा शोध न लागल्याने तात्काळ औरंगाबाद येथील जलतरण अतिदक्षता पथकास पाचारण करण्यात आले होते.

ठळक मुद्दे विधीनंतर नदीच्या पाण्यात अंघोळ करतांना भास्कर नदीत बुडाला. आज सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान या पथकाला त्याचा मृतदेह  शोधण्यास यश आले.

माजलगाव ( बीड ) : गव्हाणथडी येथील तरूण भास्कर रामचंद्र चौरे (वय 23 वर्षे) व काही नातेवाईक दशक्रिया विधीसाठी बुधवारी (दि. २५) गोदावरी नदीवर आले होते. विधीनंतर नदीच्या पाण्यात अंघोळ करतांना भास्कर नदीत बुडाला. यावेळी त्याचा शोध न लागल्याने तात्काळ औरंगाबाद येथील जलतरण अतिदक्षता पथकास पाचारण करण्यात आले होते. शेवटी आज सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान या पथकाला त्याचा मृतदेह  शोधण्यास यश आले.

माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी येथील रहिवाशी भास्कर चौरे हा नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी बुधवारी सकाळी १० च्या दरम्यान गोदावरी नदीवर आला होता. विधीनंतर स्नान करण्यासाठी पाण्यात उतरले असता तो अचानक पाण्यात बुडाला.  यावेळी ग्रामस्थांनी भास्कर याचा पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा शोध लागला नाही. यामुळे आज औरंगाबाद येथील जलतरण अतिदक्षता पथकास पाचारण करण्यात आले.या पथकाने गोदावरी पात्रात शोधा-शोध करून सकाळी 11.30 वाजता. भास्कर याचा मृतदेह शोधून काढला. अकस्मातपणे झालेल्या या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भास्कर याच्या पश्‍चात एक भाऊ, आई-वडिल असा परिवार आहे. 

 

टॅग्स :riverनदी