अंबाजोगाई, सिरसाळा येथे लोकमतचे आज रक्तदान शिबिर - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:19+5:302021-07-18T04:24:19+5:30
बीड : ''लोकमत''च्या वतीने स्वातंत्र्य सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या ...

अंबाजोगाई, सिरसाळा येथे लोकमतचे आज रक्तदान शिबिर - A
बीड : ''लोकमत''च्या वतीने स्वातंत्र्य सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत रविवारी अंबाजोगाई, सिरसाळा (१८ जुलै) येथे, तर सोमवारी (१९ जुलै) परळीत रक्तदान शिबिर होणार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत महाआरोग्य सप्ताहात लोकमतच्या संयुक्त विद्यमाने "रक्ताचे नाते" या उपक्रमात सोमवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य सेवासप्ताहमधील सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकरी, सरचिटणीस अनंत इंगळे, युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, युवा शहराध्यक्ष सय्यद सिराज, महिला आघाडीच्या अर्चना रोडे, युवती शहराध्यक्ष पल्लवी भोयटे, युवती तालुकाध्यक्ष सुलभा साळवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे. अंबाजोेगाईत आर्ट ऑफ लिव्हिंगचा पुढाकार
अंबाजोगाई : लोकमत आणि आर्ट ऑफ लिव्हिंग, भारतीय जैन संघटना व इतर संस्थांच्या सहकार्याने १८ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रक्तपेढीत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात लोकमत व आर्ट ऑफ लिव्हिंग अंबाजोगाई, भारतीय जैन संघटना, कल्पवृक्ष अकॅडमी, आधार माणुसकीचा, मार्ड, श्रमकरी ग्रुप देवळा यांचा सहभाग राहणार आहे.
रक्तदानासाठी संपर्क -
संजय कुलकर्णी-९७६७५७७७५६, धनराज सोळंकी-९४२२२४२३२६, नीलेश मुथा-९४२२२४२०८३, कल्याण नेहरकर-९४२१४७९६४७,
ॲड. संतोष पवार-९५६११९११०६, रवींद्र देवरवाडे-९८२३८०८८६७, डॉ. केदार कुटे-८०५५८१०११०, अविनाश मुडेगावकर-९९२२४०२४६३. या महारक्तदान शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन संयोजक अविनाश मुडेगावकर यांनी केले आहे.
सिरसाळा येथेही रविवारी रक्तदान शिबिर
सिरसाळा : सिरसाळा शहरात लोकमत रक्तदान मोहिमेत सहभागी असलेले शिवसेना, धनगर समाज विकास, एमआयएम, टिपू सुलतान युवा मंच सिरसाळा, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, नारीशक्ती महिला गट, टायगर ग्रुप, बहुजन वंचित आघाडी, शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान सिरसाळा, शिवसेवक समिती महाराष्ट्र, राज्यसंघर्ष वाहन चालक-मालक संघटना, मानवी हक्क अभियान सिरसाळा, ग्रामपंचायत कर्मचारी सिरसाळा, राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था सिरसाळा, पोहनेर येथील युवा वर्ग आधी सामाजिक संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभणार आहे. १८ जुलै रोजी सिरसाळा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र (सरकारी दवाखाना) येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचवून एक सामाजिक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
रक्तदानासाठी सिरसाळ्याचे लोकमत वार्ताहर डॉक्टर जे. एन. शेख यांच्या ९१३०१०६७६७ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा. सिरसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष जावेदखाॅं पठाण, उपाध्यक्ष रमेश लहाने, सचिव अनिल देशमुख व सर्व सदस्य पत्रकार संघ सिरसाळा, मराठी पत्रकार परिषद परळी तालुका उपाध्यक्ष मिलिंद राजे चोपडे, पुरोगामी पत्रकार संघ परळी तालुका ग्रामीण अध्यक्ष शेख अब्दुल्ला, माजी अध्यक्ष पत्रकार संघ सिरसाळा रफिक पठाण, पेपर एजन्सी संजय देशमुख, पेपर एजन्सी कुंडलिक लहाने व सिरसाळा परिसरातील पत्रकारांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे दात्यांना आवाहन केले आहे.