शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

भाजपच्या मस्तवाल सत्तेचाच समारोप होईल : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:16 IST

आमच्या सत्तेची सुरुवात ज्या परळीत झाली त्याच परळीतून तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप होईल, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला. शुक्रवारी परळीत मुख्यमंत्र्यांनी परळी ही चांगले कार्य सुरु करण्याची भूमी, समारोपाची नाही असे विधान करत यात्रा आयोजकांचा समारोप होईल असे विधान केले होते. त्यावर शनिवारी धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.

ठळक मुद्देकाँग्रेस - राष्ट्रवादीची परळीत संयुक्त सभा : सत्ता परिवर्तनाची वज्रमूठ आवळली

परळी : आमच्या सत्तेची सुरुवात ज्या परळीत झाली त्याच परळीतून तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप होईल, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला. शुक्रवारी परळीत मुख्यमंत्र्यांनी परळी ही चांगले कार्य सुरु करण्याची भूमी, समारोपाची नाही असे विधान करत यात्रा आयोजकांचा समारोप होईल असे विधान केले होते. त्यावर शनिवारी धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस आयच्या संयुक्त जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, आ.रामराव वडकुते, पीआरपी पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा.जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, रजनी पाटील, सुमन आर.आर.पाटील, पद्मसिंह पाटील, फौजिया खान, चित्रा वाघ, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे, राजिकशोर मोदी, सुरेश नवले, ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, सिराजभाई, गोविंद देशमुख, बजरंग सोनवणे, प्रा.सुषमा अंधारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांच्याउपस्थितीत अंबाजोगाईतील भाजपाचे दत्ता पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर पदाधिकाºाांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, राष्ट्रवादीचा समारोप करू, असे बहिणबाई बोलल्या. राष्ट्रवादी काँग्रेस संपवणे चिक्की खाण्याइतके सोपे नाही. लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत समोरासमोर या बघू कोण संपतंय असे आव्हान त्यांनी दिले.मुंडे म्हणाले, सरकारने स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावे उसतोड कामगार महामंडळ बनवले जाईल अशी घोषणा केली. मी दुर्बिण लावून शोधलं पण ऊसतोड कामगारांचं महामंडळ काही सापडले नाही, ते महामंडळच रद्द केले. हा अपमान असल्याचे ते म्हणाले.आमच्या वाटेला जाऊ नका. जशाला तसं उत्तर द्यायची धमक आमच्यात आहे. अमित शाह तडीपार आहे, तुम्ही कोणावर आरोप करता ? आधी १६ मंत्र्यांच्या जे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले आहे त्याची चौकशी करा असा टोला त्यांनी लगावला.मोदींच्या काळात ७३१ जवान शहीद झाले४सभेदरम्यान छगन भुजबळ म्हणाले, मी काही घाबरणारा नेता नाही. हे सरकार शहीद जवानाच्या नावावर राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दहशतवादी हल्ल्यांनी देश दु:खी असताना भाजपवाले राम मंदिर वही बनाएंगे असे म्हणतात, अशी टीका भुजबळ यांनी केली. मोदींच्या काळात ७३१ जवान शहीद झाले. सीमेवरील जवानही भाजपच्या काळात सुरक्षित नाही. कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे भुजबळ म्हणाले. देशातील सीबीआयसारख्या संस्था भाजप सरकारने मोडकळीस आणल्या. माध्यमांची कोंडी केली जाते. मोदी यांची मन की बात नौटंकी आहे. चहा विकला असे सांगणाऱ्या मोदींनी चहाप्रमाणे देश विकू नये असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Beedबीडcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे