राज्य सरकारविरोधात भाजपचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:55 PM2020-02-25T22:55:20+5:302020-02-25T22:56:08+5:30

महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपच्या वतीने जिल्हाभरात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी एल्गार आंदोलन करण्यात आले.

BJP's Elgar against state government | राज्य सरकारविरोधात भाजपचा एल्गार

राज्य सरकारविरोधात भाजपचा एल्गार

Next
ठळक मुद्देबीड जिल्ह्यात तालुक्यांच्या ठिकाणी धरणे आंदोलन : प्रशासनाला मागण्यांचे निवेदन; तर सरकारच्या कारभारावर टीका

बीड : शेतकऱ्यांचे नाव घेऊन एकत्र आलेल्या तीन पक्षांच्या सरकारने शेतकरी व जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. मागील सरकारने घेतलेले चांगले निर्णय रद्द करत जनमताचा विश्वासघात केला. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपच्या वतीने जिल्हाभरात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी एल्गार आंदोलन करण्यात आले. दिवसभर आंदोलनादरम्यानभाजपा नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक आणि शेतकरी सहभागी झाले होते.
माजलगाव येथे आंदोलन
माजलगाव : येथील तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनास सुरु वात करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष अरूण राऊत , माजी नगराध्यक्ष अशोक तिडके , बबनराव सोळंके , ईश्वर खुर्पे , नगरसेवक विनायक रत्नपारखी , मनोज फरके, दत्ता महाजन आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
केजमध्ये पाच तास आंदोलन
केज : येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. तहसीलदार दुलाजी मेंढके यांना निवेदन दिले. आंदोलनात नंदकिशोर मुंदडा, रमाकांत मुंडे, तालुकाध्यक्ष भगवान केदार, जि. प. सदस्या डॉ. योगिनी थोरात, विजयकांत मुंडे, विष्णू घुले, जीवन हंगे, पंजाब देशमुख, दत्ता धस, ज्ञानेश्वर चवरे, संदीप पाटील, संभाजी इंगळे, महादेव सुर्यवंशी, मुरलीधर ढाकणे, सुलाबाई सरवदे, डॉ. अमोल जाधव, पंडीत सावंत,शेषेराव कसबे, महादेव केदार आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.
उपविभागीय कार्यालयासमोर धरणे
परळी : येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आंदोलनात भाजपा राज्य चिटणीस राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतिश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, दत्ताप्पा ईटके, अशोक जैन, विकासराव डुबे, निळकंट चाटे, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, उत्तम माने, भास्कर रोडे, वैजनाथ जगतकर, प्रा. विजय मुंडे, भिमराव मुंडे, प्रा. पवन मुंडे, रमेश कराड, श्रीराम मुंडे, राजेश गीते,चंद्रकांत देवकते, रवि कांदे, शिवाजी गुट्टे आदी सहभागी झाले.
आष्टीत भीमराव धोंडे यांची टीका
आष्टी : राज्यात आघाडी नव्हे तर बिघाडी सरकार असल्याची टीका माजी आ. भीमराव धोंडे यांनी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन प्रसंगी केली. आंदोलनात सविता गोल्हार, तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे, विजय गोल्हार, सावता ससाणे, संतोष चव्हाण, तात्या कदम, लाला कुमकर, बबन झांबरे,वाल्मिक निकाळजे,अ‍ॅड. साहेबराव म्हस्के, आरपीआयचे अशोक साळवे, हनुमंत थोरवे, पांडुरंग गावडे संभाजी जगताप, अ‍ॅड . रत्नदीप निकाळजे,अज्जु भाई आदींचा सहभाग होता.
अंबाजोगाईत धरणे आंदोलन
अंबाजोगाई : मंगळवारी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात नंदकिशोर मुंदडा, तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल लोमटे, सभापती मधुकर काचगुंडे, नगरसेवक डॉ. अतुल देशपांडे, संतोष शिनगारे, दिनेश भराडिया, सुरेश कराड, अनंत लोमटे, गणेश कराड, नेताजी देशमुख, हिंदुलाल काकडे, दिलीप देशमुख, विलास जगताप, सतीश केंद्रे, अ‍ॅड. संतोष लोमटे, अ‍ॅड. राजेसाहेब लोमटे, प्रशांत आदनाक आदी सहभागी होते.
धारूर तहसीलसमोर अंदोलन
धारूर : येथील नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात बाळासाहेब गायकवाड ,अंगद मुंडे, नगरसेवक बालाजी चव्हाण, शेख गफार , बाजार समितीचे उपसभापती सुनिल शिनगारे, अ‍ॅड. मोहन भोसले, शिवाजी मायकर, रमेश नखाते, अर्जुन तिडके, भारत सोळंके, संतोष सिरसट यांनी सहभाग घेतला.
गेवराई
गेवराई : आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, राजेंद्र राक्षसभुवनकर, राहुल खंडागळे, भगवान घुंबार्डे, जि.प.सदस्य प्रल्हाद माने, शाम कुंड, उद्धव मडके, कृष्णा मुळे, दादासाहेब गिरी, महेश दाभाडे, दीपक सुरवसे, अमोल मस्के, राजेंद्र भंडारी, लक्ष्मण चव्हाण, संजय इंगळे आदी उपस्थित होते.
वडवणी
येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार सुरेखा स्वामी यांना निवेदन दिले. यावेळी माजी आ. केशवराव आंधळे, प्रा.सोमनाथ बडे, बन्सीधर मुंडे,तालुकाध्यक्ष पोपट शेंडगे, सजंय आंधळे,बाबरी मुंडे, मंचिद्र झाटे,अंकुश वारे, महादेव जमाले, श्रीमंत मुंडे, ईश्वर तांबडे, महादेव रेडे, संतोष शिंदे, सतिष मुजमुले, धनराज मुंडे, सचिन सानप आदी सहभागी होते.
शिरुर कासार
येथील तहसील कार्यालयासमोर भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. सदस्य रामदास बडे ,रामराव खेडकर , पं.स.उपसभापती जालींदर सानप ,सदस्य प्रकाश खेडकर, एम. एन. बडे, सुरेश उगलमुगले, कालीदास आघाव,किशोर खोले,विष्णु नितळ, बाजीराव सानप,महारूद्र खेडकर, गोकुळ सानप, अर्जुन खेडकर, वसंतराव सानप आदींचा सहभाग होता

Web Title: BJP's Elgar against state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.